असोदाला वाघूरचे पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:48+5:302021-02-14T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : असोदा येथील शेतकऱ्यांना वाघूर धरणाचे पाणी मिळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असोदा येथील शेतकरी वाघूरच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. तसेच आता शासनाच्या बंदिस्त पाईप लाईन करण्याच्या धोरणानुसार या पाईपलाईनसाठी निधी मिळावा, अशी मागणीदेखील या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने पाटचारी कालबाह्य ठरवत धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पोहचवण्याचे धोरण स्वीकारले आहे. वाघूर प्रकल्पाच्या या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. मात्र या भागासाठी निधीची आवश्यकता असूनही तो निधी राज्य सरकारने अजून दिलेला नाही. त्यामुळे असोदा आणि भादली परिसरातील मोठे क्षेत्र या पाण्यापासून वंचित आहे. यासाठीचा प्रस्ताव चार वर्षांपासून महामंडळाने शासनाला पाठवला आहे. ९४ कोटींच्या निधीची मागणीदेखील केली आहे. तरीही अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.
निवेदन देतांना किशोर चौधरी, ज्योती महाजन, शरद नारखेडे, संजय चिरमाडे, संजय ढाके, दिलीप अत्तरदे, मिलिंद चौधरी, सुधीर पाटील, बापू महाजन, संदीप नारखेडे, योगराज भोळे, जितेंद्र भोळे, राजेंद्र चौधरी, गोपाळ ढाके उपस्थित होते.