चाळीसगावात ७१ जलयोद्धे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:15 PM2019-05-29T16:15:00+5:302019-05-29T16:15:06+5:30
कामाची दखल : सामाजिक संघटनातर्फे देण्यात आले पुरस्कार
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात सत्यमेव जयते अंतर्गत पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. यात तालुक्यातील जवळपास ७१ गावांनी सहभाग नोंदविला होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हिरीरीने सहभाग घेऊन श्रमदान करीत जलसमृद्धीचा जागर केला. यानिमित्त शहरातील महाशब्दे हॉल येथे तालुक्यात जलसमृद्धीसाठी आग्रही राहिलेल्या ७१ श्रमिकांना सामाजिक संघटनांतर्फे 'जलयोद्धा पुरस्कार' देवून गौरविण्यात आले.
हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, नगरसेविका सविता राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, जलसाक्षर अभियानाचे प्रमुख स्वप्नील कोतकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.सुनिल राजपूत, डॉ.विनोद कोतकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक जयपाल हिरे, तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, माजी नगरसेवक महेंद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी भडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती गीता पाटील, पं.स.सदस्या सुनिता पाटील, रांजणगावच्या सरपंच सोनाली निंबाळकर, उत्तमराव पाटील, अनिल नागरे, डॉ.सुनिता घाटे, डॉ.मुकुंद करंबेळकर, नगरसेवक दीपक पाटील, सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, जिजाऊ समितीच्या सोनल साळुंखे, प्रीती रघुवंशी, वैष्णवी राजपूत, योगिता राजपूत, दिपक सुर्यवंशी, धर्मराज बच्छे, राकेश कोतकर, सुधीर चव्हाण, राहुल राजपूत, रणजित राजपूत, सुजित पाटील, शेखर निंबाळकर, प्रमोद चव्हाण, संदीप कापसे, श्रीकांत राजपूत, आकाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.