गॅस सबसिडी सोडणा:या पानटपरी चालकाचा पंतप्रधान यांच्याकडून गौरव
By admin | Published: June 19, 2017 01:19 PM2017-06-19T13:19:10+5:302017-06-19T13:19:10+5:30
भडगाव येथील अजय पाटील या तरुणाने घरगुती गॅसवर केंद्र शासनाकडून दिली जाणारी सबसिडी (अनुदान) नाकारून सरकार जमा केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सहीचे पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.19 : स्वत: साठी जगत असताना देशसेवेलाही हातभार लावावा या भावनेने भडगाव येथील पानटपरी चालक अजय राजधर पाटील या तरुणाने (वय 40) घरगुती गॅसवर केंद्र शासनाकडून दिली जाणारी सबसिडी (अनुदान) नाकारून सरकार जमा केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून त्यांच्या या निर्णयाची दखल घेत आपल्या सहीचे पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
अजय पाटील हे मुळचे कोठली येथील असून भडगाव येथे पानटपरीचा व्यवसाय करतात. साधारण परिस्थिती असताना त्यांनी शासनाकडून देण्यात येणारी गॅस सबसिडी नाकारली होती. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेले पत्र प्राप्त झाले आहे. त्यांना लहानपणापासून देशसेवा, समाजसेवेची आवड आहे. ते सध्या स्वामी समर्थ कॉलनीत राहतात.