कारची काच फोडून साडेतीन लाख लांबविले
By admin | Published: March 11, 2017 12:57 AM2017-03-11T00:57:11+5:302017-03-11T00:57:11+5:30
गोलाणी मार्केटनजीकची घटना : भुसावळ येथील नगरसेवकाला धक्का; 3 दिवसातील दुसरी घटना
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलचे स्क्रीन कव्हर तसेच टफन ग्लास बसविण्यासाठी गेलेल्या भुसावळातील नगरसेवक अमोल इंगळे यांच्या कारची काच फोडून कारमधील साडेतीन लाख रूपये लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या गल्लीत घडली़ अर्धा तासाच्या अंतरात चोरटय़ांनी काच फोडून पैशांची कापडी पिशवी लांबविली़
भुसावळ येथील नगरसेवक अमोल मनोहर इंगळे रा़ शांतीनगर हे सायंकाळी 5़ 45 वाजता त्याच्या कारने (एम एच 19 बी़डी़ 4141) जळगावात आल़े खाजगी कामासाठीचे अडीच लाख रूपये त्यांनी कापडी पिशवी सोबत आणले. जळगावात आल्यानंतर त्यांना आणखी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी बालाजी बिल्डींग, जुने जळगाव येथील त्यांच्या गोविंदभाई नामक मित्राकडून एक लाख रूपये घेतल़े घरून आणलेले अडीच लाख व एक लाख असे एकूण शंभर, पाचशे व दोन हजाराच्या नोटा असलेले साडेतीन लाख रूपये कापडी पिशवीत ठेवल़े
तीन दिवसात दुसरी घटना
मनोज पंढरीनाथ मराठे (रा़खोटेनगर, मूऴभडगाव) हे जळगावात औषध तयार करणा:या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी ते भडगाव येथून त्यांची आई प्रमिला मराठे यांना जळगावात घेऊन आले होते.
दुपारी 12 वाजता दवाखान्यात जाण्यासाठी त्यांनी शिवतीर्थ मैदानाच्या कंपाउंड बाहेर कार (क्ऱएम़एच- 19 ए़वाय 8891) लावली. डॉक्टरांकडे जाऊन दोघे मायलेक 15 मिनिटांत पुन्हा कारजवळ आले. त्यांच्या उभ्या असलेल्या कारच्या खिडकीची काच फोडून चोरटय़ांनी गाडीतील 35 हजार रुपये रोख, ग्रॅम सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा 87 हजारांचा ऐवज असलेली बॅग लांबविली होती़ घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी पुन्हा साडेतीन लाख रूपये लांबविल्याने पोलिसांचा धाक नसल्याचे समोर आले आहे.
अध्र्या तासात चोरटय़ांची हातसफाई
मोबाईलला स्क्रीन कव्हर तसेच टफन ग्लास लावायचा असल्याने इंगळे कारने सायंकाळी 6़15 वाजता गोलाणी मार्केटजवळ पोहचल़े यादरम्यान त्यांनी अग्निशमन कार्यालयाच्या गल्लीत कार्यालयासमोर रस्त्याच्या एका बाजूला कार लावली़ यानंतर ते गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकानावर केल़े स्क्रीन कव्हर तसेच टफन लावत असताना त्यांना कारमध्ये पैसे असल्याचे लक्षात आल़े त्यांनी तत्काळ कारकडे धाव घेतली़ गाडीजवळ पोहचले असता दगडाच्या सहाय्याने कारच्या डाव्या बाजूची काच फोडलेली होती व मागील सिटवर ठेवलेली साडेतीन लाख रूपये असलेली कापडी पिशवी नसल्याचे समजल़े चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शहर पोलिसांना घटना कळविली़