धरणगावला गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:25 PM2019-02-02T17:25:53+5:302019-02-02T17:26:10+5:30

पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला फाटा

Glory of Dharnagala Quality | धरणगावला गुणवंतांचा गौरव

धरणगावला गुणवंतांचा गौरव

googlenewsNext

धरणगाव : ड्रोन, रोबोटिक्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून आजच्या पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला फाटा देत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी सज्ज होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक रावसाहेब पाटील यांनी केले.
येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडीयम स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.अरुण शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.कांचन महाजन, डॉ.संदीप सराफ उपस्थित होते. प्राचार्या वैशाली पवार, शाखा व्यवस्थापक जगन गावीत यांनी स्वागत केले. भारती तिवारी व विद्यार्थिनींच्या चमूने स्वागत गीत सादर केले. स्वाती भावे यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता..’ हे गीत सादर केले.
प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय लक्ष्मण पाटील यांनी केला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांच्याहस्ते नर्सरी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विशेष प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शालेय स्पर्धा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नाजनीन शेख, प्रियंका मोराणकर, चैताली रावतोळे, नाजुका भदाणे यांनी केले.
यशस्वीतेसाठी प्राचार्या वैशाली पवार, शाखा व्यवस्थापक जगन गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संतोष सूर्यवंशी, रिबेका फिलिप, भारती तिवारी, चैताली रावतोळे, रमिला गावीत, स्वाती भावे, पूनम बाचपाई, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, सपना पाटील, प्रियंका मोराणकर, अनुराधा भावे, लक्ष्मण पाटील, अमोल श्रीमावळे(सोनार), विकास भोई, समाधान पाटील, अमोल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.


फोटो--मान्यवरांसोबत गुणवंत विद्यार्थी

Web Title: Glory of Dharnagala Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव