दहावीच्या गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:56+5:302021-07-21T04:12:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बहुतांश शाळांनी दहावीच्या निकालात शंभर टक्के यश मिळवले आहे. शाळांनी निकालानंतर आपल्या यशवंत ...

The glory of the meritorious of the tenth | दहावीच्या गुणवंतांचा गौरव

दहावीच्या गुणवंतांचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बहुतांश शाळांनी दहावीच्या निकालात शंभर टक्के यश मिळवले आहे. शाळांनी निकालानंतर आपल्या यशवंत आणि गुणवान विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

विद्या स्कूलचा निकाल १०० टक्के

विद्या इंग्लिश स्कूलमधून मानसी शिरसाठ ९७.६० टक्क्यांसह प्रथम आली आहे. त्यासोबतच भूमिका जाधवानी ९७ टक्के, रितिका तेली ९५.२० टक्के, नंदिनी पाटील ९३.८० टक्के, राजदीप निळे ९३ टक्के, हैदर अली कपासी ९३ टक्के, भावना वैष्णव ९२.८० टक्के, गौरी बागुल ९२.६० टक्के, कोमल परदेशी ९१.८० टक्के, प्रतीक कोल्हे ९१.२० टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक हॅरी जॉन व प्रशासक कामिनी भट यांनी त्याचे कौतुक केले आहे.

आर. आर. विद्यालय

आर. आर. विद्यालयात अव्वल आलेल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात तेजस्विनी नारखेडे ९९.८० टक्के, मीनल चौधरी ९८.५० टक्के, धनश्री वानखेडे ९७.८० टक्के, जयेश नाईक ९७ टक्के, महेश पाटील ९६.८० टक्के, उत्कर्षा पाटील ९६.४० टक्के, सेजल तायडे ९६.४० टक्के, तनुजा परदेशी ९६.२० टक्के, पूजा चौधरी ९५.६० टक्के, अनुज पाटील ९५.६० टक्के, हेमंत चव्हाण ९५.६० टक्के, राजश्री बोरसे ९५.६० टक्के, गौरव वानखेडे ९५.६० टक्के, सुमित बाविसने ९५.६० टक्के यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी, सचिव मुकुंद लाठी, प्र. मुख्याध्यापक परेश श्रावगी उपस्थित होते.

भंगाळे विद्यालय

सीताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून हर्षदा मोतीलाल हिने प्रथम, तर भूमिका जैन हिने द्वितीय क्रमांक पटकावला. पुनम सुरवाडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

मुंदडे विद्यालय

पी. एम. मुंदडे विद्यालयाचा १०० टक्के लागला आहे. त्यात निहाल शिंदे याने शाळेतून पहिला क्रमांक पटकावला. घनश्याम मिस्त्री, कल्पेश कुंभार, श्रुती सोनवणे यांनी यश मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोक मुंदडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी कौतुक केले.

पाटील विद्यालय

नानासाहेब आर. बी. पाटील विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळेतून खुशाल पाटील प्रथम, रिया पाटील द्वितीय आणि गौरव पाटील तृतीय ठरला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव योगेश पाटील उपस्थित होते. संदीप ठोसर यांनी आभार मानले.

नवीन माध्यमिक विद्यालय

कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर आणि नवीन माध्यमिक विद्यालयात प्रतीक्षा डोखे हिने ९५.६० गुणांसह पहिला क्रमांक मिळवला. आदित्य माळी याने द्वितीय, हर्षा पाटीलने तृतीय, दर्शन मराठेने चौथे, तर प्रांजली सोनवणे हिने पाचवे स्थान मिळवले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याबद्दल संस्थाचालक प्रा. डॉ. युवराज वाणी, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक यांनी कौतुक केले आहे.

जिजामाता विद्यालय

जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष डी. एल. महाले आणि मुख्याध्यापक राजेंद्र खोरखडे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. अंकिता माळी, अपर्णा ठाकूर, नेहा धनगर, धनश्री सनांसे, कोमल बारी, लक्ष्मी सुतार या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी, आशा पाटील, संजय खैरनार उपस्थित होते.

स्वामी समर्थ विद्यालय

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात स्नेहा रतिलाल पाटील हिने ९६.४० टक्के गुणांसह पहिले स्थान पटकावले. नेहा जोगी ९४.८० टक्के, चैतन्य पाटील ९४.४० टक्के, निखिल चौधरी ९२.८० टक्के, निखिल पाटील ९२ टक्के यांनी यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, सचिव विशाल देवकर, मुख्याध्यापक सुरेखा महाजन यांनी कौतुक केले.

इकरा उर्दु हायस्कूल

सालारनगर येथील इकरा उर्दु हायस्कूलमध्ये लाएबा नविद निजामी हिने ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सादियाबी शेख अस्लम ९४ टक्के हिने द्वितीय तर, सामिया नाज शेख अब्दुल तालिब ९१.८० टक्के, चौथा क्रमांक मुब्बशेरा नाज मुख्तार अहमद पांडे, पाचवा क्रमांक सामिया परवीन खलील अहमद व शेख शमाईला अहमद हुसेन यांनी मिळवला. इकरा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह, सचिव एजाज मलिक, प्रा. एस. एम. जफर, मुख्याध्यापक डॉ. शेख हारुन बशीर यांनी कौतुक केले.

श्रीराम माध्यमिक विद्यालय

श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात सेमी इंग्लिश माध्यमात अंकिता इंगळे हिने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. दीप्ता तायडे ९१.८० टक्के द्वितीय, सीमा पाटील तृतीय, रश्मी पाटील चौथी, कल्पेश बाविस्कर पाचवी, तर मराठी माध्यमातून डिम्पल राणे प्रथम, आरती नाईक द्वितीय, डिम्पल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अध्यक्ष अशोक लाडवंजारी, अध्यक्ष पन्नालाल वंजारी, वासुदेव सानप, मुख्याध्यापक दिवाकर जोशी, प्रतिभा पाटील, दिनेश पाटील उपस्थित होते.

अ. मजीद सालार इकरा उर्दु स्कुल

बोरनार, ता. जळगाव येथील अ. मजीद सालार इकरा उर्दु हायस्कूलमध्ये अलशिफा फारुक शाह हिने ९०.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सुमैय्या असलम पटेल हिने दुसरा, तर फैज फिरोज शाह याने तिसरा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांचे कौतुक डॉ. करीम सालार, सचिव एजाज मलिक, अमिनोद्दीन शेख, डॉ. इक्बाल शाह, मुख्याध्यापक सलीम शाह, शेख रोशन, आरीफ खान, मजहर खान, शेख जव्वाद, खान फिरोज, शेख सादीक, शेख आमीर, आबीद पिंजारी यांनी केले.

Web Title: The glory of the meritorious of the tenth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.