मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रात वाघाचे वैभव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:51 PM2019-05-19T19:51:58+5:302019-05-19T19:53:12+5:30
बुद्धपौर्णिमेला वढोदा वनपरिक्षेत्रात प्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंद घेण्यात आली आहे
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बुद्धपौर्णिमेला तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात प्राणी गणनेत पट्टेदार वाघाच्या डरकाळीने दोन वाघांची नोंद घेण्यात आली आहे, तर अनेक वेळा ट्रॅप कॅमेºयात हजेरी देणाºया बिबट्याचे अस्तित्व मात्र या गणनेत दिसून आले नाही.
वढोदा वनपरिक्षेत्रात १० ठिकाणी मचाण व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात सहा ठिकाणी मचाण बांधण्यात आलेल्या होत्या. पट्टेदार वाघाचे गतवैभव असलेल्या विशेष म्हणजे वढोदा वनपरिक्षेत्रातील जंगलातील पाणवठ्यावर एकही पट्टेदार वाघ दिसुन आला नाही, परंतु वढोदा वनपरिक्षेत्रातील दक्षिण डोलारखेडा नवीन पाणवठ्याजवळील मचाणीवर रविवारी पहाटे पाच वाचून १० मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकू आली. तसेच दक्षिण डोलारखेडा पूर्णा नदीकाठाजवळील मचाणीवर देखील रविवारी पहाटे चार वाजून ५६ मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकू आली आहे. प्राणी गणनेची पूर्ण आकडेवारी सोमवारी उपलब्ध होणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात एकही बिबट्या दिसून आला नाही हे विशेष.
वढोदा वनपरिक्षेत्रात वढोदा, कुºहा, चारठाणा, डोलारखेडा या बीटमधील १० मचाणीवर उपस्थितांना चितळ, माकड, रानडुक्कर, रानमांजर, अस्वल, मोर, चिंकारा, नीलगाय, सायळ हे प्राणी दिसले.
मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात रूईखेडा, बोदवड , कुºहे पानाचे, गोळेगाव या बीटमध्ये सहा मचाणी होत्या. येथे रानडुक्कर, नीलगाय, मोर, रानमांजर हे प्राणी दिसले.