जीएमसी ठरले कोरोना बळीचे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:29 AM2021-02-06T04:29:05+5:302021-02-06T04:29:05+5:30

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच कोरोना उपचाराची सुविधा असल्याने या ...

GMC became Corona victim's hotspot | जीएमसी ठरले कोरोना बळीचे हॉटस्पॉट

जीएमसी ठरले कोरोना बळीचे हॉटस्पॉट

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच कोरोना उपचाराची सुविधा असल्याने या रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक ५२२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुलैनंतर या रुग्णालयाचा रिकव्हरी रेट वाढला. गेल्या दोन महिन्यांपासून जीएमसीत मृत्यूची संख्या घटून दहा पेक्षाही कमी झाली आहे.

जिल्ह्यात २८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तर २ एप्रिल रोजी अन्य एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला मृत्यू नोंदविण्यात आला आहे. जुलै- ऑगस्टच्या दरम्यान खासगी रुग्णालयांना कोरोना उपचाराची परवानगी देण्यात आली. तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात कोरोना योजनेंतर्गत उपचार केले जात होते. मृतांमध्ये डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४०५ मृत्यूची नेांद असून गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये ५६ मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दरबारी करण्यात आली आहे. १९ कोरोना रुग्ण हे मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते.

लिंगनिहाय जिल्ह्यातील मृत्यू

पुरुष - ९५८

महिला - ४०१

एकूण रुग्ण -५७२०६

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ५५५१७,

एकूण कोरोनाचे मृत्यू - १३५९

महिना निहाय मृत्यू

एप्रिल - १०

मे - ७१

जून - १६३

जुलै- ३५५

ऑगस्ट-४५८

सप्टेंबर-३७१

ऑक्टोबर-८३

नोव्हेंबर-३२

डिसेंबर-३०

जानेवारी -२७

फेब्रुवारी - ०३

तालुकानिहाय मृत्यू

जळगाव -३८३, भुसावळ -१८९, अमळनेर- १०३, चोपडा-७७, पाचोरा- ७४, भडगाव-४४, धरणगाव - ५१, यावल - ६७, एरंडोल - ४८, जामनेर - ७४, रावेर- १०३, पारोळा - १८, चाळीसगाव - ७८, मुक्ताईनगर- ३६, बोदवड- १४

८८ टक्के मृत्यू ५० वर्षांवरील

जिल्हाभरात झालेल्या १३५९ मृत्यूपैकी ८८ टक्के मृत्यू म्हणजेच १२०३ मृत्यू हे ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांचे झाले आहेत. शून्य ते २० वर्षे वयोगटात एका तर एक ते दहा वयोगटात एकही मृत्यू नसल्याची नोंद आहे. मृतांमध्ये ६६१ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अन्य व्याधी होत्या. यातही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना मधुमेह असल्याचे मृत्यू परीक्षण समितीच्या विश्लेषणातून समोर आले होते.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू

अन्य इतर महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. या महिन्यात एकूण १६२०३ रुग्ण आढळून आले होते. तर ४५८ मृत्यूची नोंद झाली होती. जिल्ह्यात यादरम्यान कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली होती. कमी वयाच्या मृत्यूमुळे चिंतेचे वातावरण होते. ५० पेक्षा कमी वयोगटातील काही बाधितांचे या महिन्यात मृत्यू नोंदविण्यात आले होते.

जळगाव तालुक्यात अधिक मृत्यू

जिल्हाभरात जळगाव तालुक्यात सर्वाधिक ३८३ मृत्यूची नोंद झाली आहे. यात जळगाव शहरातील ३०० मृत्यूंचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूच्या २२ टक्के मृत्यू हे जळगाव शहरात झालेले आहेत. या खालोखाल भुसावळ येथे १८९ मृत्यूची नोंद आहे. जळगाव ग्रामीणमध्येही ८३ मृत्यू झाले असून जिल्ह्यात बोदवड तालुक्यात सर्वाधिक कमी १४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: GMC became Corona victim's hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.