जीएमसीसाठी आता सुलभ शौचालय व वाहनतळ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:44+5:302021-01-09T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात एक सुलभ शौचालय, वाहनतळ सपाटीकरण, जनरेटर अशा विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात एक सुलभ शौचालय, वाहनतळ सपाटीकरण, जनरेटर अशा विविध सुविधांसाठी प्रस्ताव द्या, निधी लगेच देऊ, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालय परिसरात पाहणी करून समाधान व्यक्त केले.
येत्या पंधरा दिवसात या सुविधात्मक कामांनाही सुरूवात होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. पालकमंत्र्यांनी अधिष्ठातांच्या कार्यालयातही बैठक घेतली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, डॉ. विलास मालकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेचे कौतुक
पालकमंत्री पाटील यांनी नाव नोंदणी कक्षासह विविध कक्षांची पाहणी करून आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.
संभाजीनगर नामकरणाची सेनेची भूमिका
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः औरंगाबादचे नामकरण ''''संभाजीनगर'''' व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेकडून शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच येतो. नामांतराच्या प्रश्नी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रीत तोडगा काढतील,अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला.