जीएमसीतील स्वच्छतेची फेस इंडियाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:32+5:302021-06-19T04:12:32+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता, सुशोभिकरण व रंगरंगोटीची दखल घेऊन जागतिक पातळीवर फेस इंडिया फाैंडेशन ...
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता, सुशोभिकरण व रंगरंगोटीची दखल घेऊन जागतिक पातळीवर फेस इंडिया फाैंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेने "फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड" हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते. रुग्णालयात आवारातील भिंती रंगवण्यात आल्या आहेत. प्रमाणपत्रावर संस्थापक व अध्यक्ष वीरेन लोटस यांची स्वाक्षरी आहे. कलावंत विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले.
दरम्यान, अद्यापही आपल्याला नवीन जिल्हाधिकारी म्हणूनच संबोधले जाते. त्यामुळे वर्ष कधी गेले समजलेच नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. दरम्यान, आमचीही दिवसभर ओपीडी असते, मात्र, ती डॉक्टरांच्या ओपीडीपेक्षा वेगळी असते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्याचे नाव आता देशपातळीवर गौरवाने घेतले जात असल्याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले. तीनही अधिकाऱ्यांचा 'अमर, अकबर, ॲन्थोनी' असा त्यांनी उल्लेख करताच, एकच हशा पिकला. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.
यांचा केला सन्मान...
प्राचार्य डॉ. अविनाश काटे, प्रा. डॉ. वैशाली काटे, अविनाश काटे, हर्षल कदम, सत्यनारायण पवार, प्रवीणसिंग पाटील, कंत्राटी कर्मचारी राहुल सपकाळ, आरिफ पठाण, प्रमोद कोळी, लक्ष्मण मिस्तरी, प्रकाश सपकाळ, राकेश सोनार, अनिल बागलाणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड यांचा सत्कार केला.