पर्यटनाला जायचे बैलगाडीत जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:35 AM2017-10-19T00:35:34+5:302017-10-19T00:36:22+5:30

अजिंठा लेणीच्या पर्यटकांचे हाल :एस.टी. संपाचा फटका; ४ कि.मी.साठी ५० रुपये वसुली

Go to the bullock cart to travel! | पर्यटनाला जायचे बैलगाडीत जा!

पर्यटनाला जायचे बैलगाडीत जा!

Next
ठळक मुद्देबस कर्मचाºयांच्या बंदचा फटका पर्यटकांनाहीऐन दिवाळीत मिळालेल्या सूट्यांचा उपयोग नाहीपर्यटकांची होतेय लुट

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकोद, ता.जामनेर : एस.टी. कर्मचाºयांचा बेमुदत संप आणि पर्यटन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाºया देशी व विदेशी पर्यटकांना बसत आहे. खासगी वाहनचालकांकडून अवघ्या चार किलोमीटरसाठी ५० रुपयांची भाडे आकारणी करण्यात येत आहे. मंगळवारी काही पर्यटकांनी बैलगाडीने तर काहींनी पायी प्रवास केला.
अजिंठा लेणीत खासगी वाहनांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीदरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या प्रदूषणमुक्त बसेस चालवून पर्यटकांची प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र एसटी कर्मचाºयांनी संप पुकारल्याने टी पॉइंट ते अजिंठा लेणीदरम्यानची बससेवा बंद पडली. पर्यटन विकास महामंडळाकडून कोणतेही नियोजन न झाल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही पर्यटकांनी जाब विचारण्यासाठी व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. मात्र येथील व्यवस्थापक सुट्टीवर होते़ पर्यटकांनी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
दरम्यान, फर्दापूर येथील काही स्थानिक नागरिकांनी बैलगाडीमधून शंभर, दोनशे रुपये व्यक्तीप्रमाणे पर्यटकांना अजिंठा लेणीत ने-आण करणे सुरू केले. त्यामुळे काही पर्यटकांनी बैलगाडीने तर काही पर्यटकांनी पायीच अजिंठा लेणी गाठली, तर अनेक पर्यटकांनी अजिंठा लेणी न बघताच माघारी फिरणे पसंत केले. पर्यटन महामंडळाबाबतचा संताप पाहता फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद जºहाड, उपनिरीक्षक नीलेश घोरपडे यांनी मध्यस्थी करीत सोयगाव आगारप्रमुखांना विनंती केली. त्यानुसार दुपारी फर्दापूर टी पॉर्इंट ते अजिंठा लेणीदरम्यान खासगी चालकांच्या मदतीने चार बसेसद्वारे बससेवा सुरू करण्यात आली.
माझ्यासोबत वृद्ध आई-वडील आहेत. त्यांना लेणीत पायी जाणे शक्य नाही. संपाचा विचार करुन प्रशासनाने येथे खासगी वाहने उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पर्यटन विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी
- अनुपकुमार प्रसाद (पर्यटक पटणा
 

Web Title: Go to the bullock cart to travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.