गो कलेक्टर, गो डीन, सरकारचा धिक्कार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:51 AM2020-06-11T11:51:40+5:302020-06-11T11:51:54+5:30

अधिष्ठाता दालनाबाहेर आंदोलन, घोषणाबाजी : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

Go Collector, Go Dean, damn the government ... | गो कलेक्टर, गो डीन, सरकारचा धिक्कार...

गो कलेक्टर, गो डीन, सरकारचा धिक्कार...

Next

जळगाव : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे देशापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर हा अधिक आहे़ ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे़ आता तर बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा बुधवारी स्वच्छतागृहातच मृतदेह आढळून आला़ यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़ या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर ‘गो कलेक्टर गो़़़ गो डीन गो, राज्य सरकारचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़
यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड़ शुचिता हाडा, अतुलसिंह हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, राधेश्याम चौधरी, राजेंद्र घुगे, सुनील खडके, दीपमाला काळे, मीनाक्षी पाटील, चेतना चौधरी, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख, चंद्रशेखर पाटील, मनोज आहुजा, अरविंद देशमुख, रेश्मा काळे, सरिता नेरकर, सुरेखा तायडे आदींची उपस्थिती होती़
रुग्णांवर लक्ष नाही का?
मृत्यूदरात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर असताना सिव्हील प्रशासनाकडून चुकांवर चुका केल्या जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळला अर्थातच त्याठिकाणी नियमित साफसफाई केली जात नाही व कोरोना कक्षात कोरोना रूग्णांवर लक्ष ठेवले जात नाही यासह अनेक प्रश्न कैलास सोनवणे यांच्यासह भाजपा पदाधिकारींनी उपस्थित करीत अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली़ त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याच्या प्रकाराबाबत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिष्ठातांना धारेवर धरले. तर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसोबत ज्यांना काहीही नाही त्यांना सोबत ठेवले आहे़, अशी माहितीही कैलास सोनवणे यांनी अधिष्ठानांना दिली व त्या गंभीर प्रकाराबाबत त्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली़
कारवाई करा
सिव्हील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह वृध्द महिलेचा कोविड रूग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृत्यू झाला असून सिव्हील प्रशासनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील माळी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ या संपूर्ण प्रकाराला सिव्हील प्रशासन जबाबदार असून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे़
 

Web Title: Go Collector, Go Dean, damn the government ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.