गो- संवर्धन ही एक चळवळ व्हावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:31 PM2019-06-06T12:31:56+5:302019-06-06T12:32:32+5:30
गाय ही सकारात्मक उर्जा देणारी शक्ती
गाय ही सकारात्मक उर्जा देणारी शक्ती असून तिच्या सहवासात राहिल्याने अनेक विकारांपासून मुक्ती मिळण्यासह तिची नित्य सेवा केल्यास सर्व समस्या मिटतात. त्यामुळे गो-मातेच्या संवर्धनाची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गो- मातेला राष्टÑीय माता दर्जा दिला आहे. गो-मातेच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम देशात संपूर्णत: गो- हत्या बंदी करावी व या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. गो- माता सेवा करण्यासाठी सर्व धर्मियांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागाने गो- संवर्धनासाठी लोक चळवळ सुरू व्हावी. जळगाव जिल्ह्यात २००९ पासून सामूहिक गो-सेवा एक अभियान सुरु आहे. शासन व प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर देशी-गायींची संवर्धनाची जबाबदारी घ्यावी. देशी गायींचे दूध, तूप, गोमुत्र, गोबर (शेण) असे पंचगव्य जनकल्याणासाठी उपयुक्त आहे. धर्मशास्त्रात गो- संवर्धनासाठी असे म्हटले गेले आहे की, जेथे गो- माता आनंदाने श्वास घेईल तेथे विकास आपोआप होईल. देशी-गायीच्या गोबर, गोमूत्र यामुळे सर्व शेती सेंद्रीय व नैसर्गिक होते. मोदी सरकारने देशी गायींच्या संवर्धनासाठी उपाय- योजना कराव्यात. तर प्रत्येक शेतकऱ्यांने एक देशी गाय घ्यावी, सरकारने गो- संवर्धनासाठी अनुदान द्यावे व भारत हा विश्वगुरू होण्यासाठी देशातील शेतकरी बांधवाचे योगदान मिळेल. यातून गो- संवर्धन होवून देशात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, असा विश्वास आहे, गरज आहे ती केवळ पुढाकाराची
- अॅड.विजय काबरा, गो- सेवक.