गायत्री परिवारातर्फे वरखेडीत गो-माता पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:05 PM2018-11-23T22:05:13+5:302018-11-23T22:07:44+5:30

महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवारच्या महिला साधकांनी विश्वशांती अभियान गो संरक्षणार्थ हवन पूजा करीत गो शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची लापशी खाऊ घालण्यात आली.

Go-mata Pujan in Varakhedi by Gayatri Parivar | गायत्री परिवारातर्फे वरखेडीत गो-माता पुजन

गायत्री परिवारातर्फे वरखेडीत गो-माता पुजन

googlenewsNext
ठळक मुद्देगायत्री मंत्र व मंत्रोच्चार करीत होम, हवन पुजागार्इंना खाऊ घातली गावराणी तुपाची लापसीविश्वशांतीसाठी केली प्रार्थना

वरखेडी ता.पाचोरा - महावीर गोशाळेत पाचोरा गायत्री परिवारच्या महिला साधकांनी विश्वशांती अभियान गो संरक्षणार्थ हवन पूजा करीत गो शाळेतील सर्व गाईंना गावरानी तुपाची लापशी खाऊ घालण्यात आली. यावेळी गाईची विधिवत पूजा करण्यात येऊन गाईस परिक्रमा केली व त्यानंतर गायत्री मंत्र व मंत्रोच्चार करीत हवन पूजा केली.
गायत्री परिवाराच्या प्रमुख लीला तोतला यांना या हवन पूजेविषयीचा उद्देश सांगितला. विश्वशांती अभियान गो-संरक्षण या कार्यक्रमादरम्यान गायत्री परिवाराच्या सर्व महिला येथे हवन पूजा करून गाईंना गावरानी तुपाची लापशी खाऊ घालण्याच्या उद्देशाने महावीर गोशाळेमध्ये दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोशाळा संचालक राजेंद्र बडोला, पप्पू बडोला, चेतन बडोला, अनिल साकरीया यांनी स्वागत केले. यावेळी सारिका तोतला, जागृती तोतला, सुनिता तिवारी, अनिकेत तोतला, सरस्वती पाटील, सरला न्याती, कल्पना पुजारी, वंदना काबरा, निर्मला जैन, सुमित्रा पवार, उषा बाहेती, किरण मुंगड, प्राची बाहेती, डॉ.प्रदीप बाहेती, सी.ए.महेश तोतला, मनिष काबरा, सचिन बाहेती, अमोल पुजारी, जगदीश पुजारी, गौरी बाहेती गिरड, चित्रा बाहेती, अलका बाहेती, सीमा बिर्ला, गौरी पुनम बाहेती, लक्ष्मी बाहेती, कांता सोमानी यांची उपस्थिती होती.

Web Title: Go-mata Pujan in Varakhedi by Gayatri Parivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.