देव बठ्ठ देखस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:10+5:302021-07-04T04:13:10+5:30

"पप्पा, मंदिर म्हा तं आंधारं शे ? देव तं दिखत नही ? मंग तुम्ही नमस्कार कोन्हले करा ? आंधाराम्हा ...

God bless you | देव बठ्ठ देखस

देव बठ्ठ देखस

Next

"पप्पा, मंदिर म्हा तं आंधारं शे ? देव तं दिखत नही ? मंग तुम्ही नमस्कार कोन्हले करा ? आंधाराम्हा तुम्हना नमस्कार देवले दिखीन का ? "

तेन्हा सवाल रोकडा व्हतात. तेल्हे सांगं.

"बेटा, देव सर्व शक्तीमान रहास. देव बठ्ठ देखस. तो देव शे ना. म्हनून तो सर्वाज ठिकाने रहास. आनी सर्व देखस."

हे त्याले कितलं समजनं ते माहीत नही. पन, मनम्हा इचारस्नी टूबलाईट चमकनी. देव शे का नही शे.? हाऊ तसा संशोधनना विषय शे. ज्ञानी - अभ्यासू ती चर्चा करतसज. पन देव शे हाई श्रध्दा मानी, तर कितला मोठा आधार भेटस. जव्हय मानुस संकटम्हा सापडस, मदतले कोनी येत नही, तव्हय तेल्हे फक्त देवज याद येस. तो शे हाई नुसती श्रध्दाबी, मानुसले जगानं बय देस. लढानी हिम्मत देस. जव्हय दवाखानाम्हा आपलं मानूस भर्ती रहास. तव्हय आपन डाक्टरन्या कितल्या किलावन्या करतस. डाक्टरम्हा आपले देव दिखस. तव्हय डाॅक्टरबी सांगतंस. आम्हीतं गंज प्रयत्न करी ऱ्हायनूत. पन आते पुढे, त्या वरलांनां हाथ म्हा शे. तो वरला म्हंजेच, देवनं हो ! जेन्ही हाई जग बनाडं. जनावर, झाडं, झुडपं, हवा-पानी तेन्हीज तं बनाडेल शे. न्हा. महात्मा ज्योतिबा फुलेस्नी देव नाकारा. पन हाई सृष्टी जेन्ही बनाई, त्या निर्मिकले, तेस्नीबी मानज नां ? त्या निर्मिकले, तेन्ही शक्तीले आनी तेन्हं आस्तित्वले मानं तरी गंज शे. श्रध्दा जोयजे, पन ती अंधश्रद्धाम्हा बदलाले नको. श्रध्दा आनी अंधश्रध्दाम्हा एक आंधूक रेषा रहास. ती जेल्हे समजनी तेन्हा उद्धार निश्चित शे.

देव शे. तो बठ्ठा ठिकाने शे....आनी तो बठ्ठ देखस. देखेल नी नोंद ठेवस. चांगलं काम करनारले बक्षीस देस.... आनी वाईट काम करनारस्ले शिक्षा करस, इतलं मानं तरी जगम्हा बठ्ठा कामं बिनबोभाट चालथीन. देव बठ्ठ देखस हाई जर मनम्हा बठनंत कोन्हीबी, कोठेबी चुकीनं वागाऊ नही. चोरी चपाटी, वाईट काम कऱ्हाऊ नही. मापम्हा पाप करतांना, दुधम्हा पानी टाकतांना तेले देव दिखीन. लांडीलबाडी करतांना देव दिखीन. लेकी-बाईस्कडे वाईट नजर टाकता, तेन्हा मनम्हा कापरं भराईन. पापज व्हवाऊ नही नं. तो बठ्ठ देखस. आनी चुकीनं काम करं की शिक्षा भेटस, इतलं बी उमगनं, तरी पोलीसं आनी पोलिस ठेसननं काम उराऊ नही. मनवर एक प्रकारना वचक बठी. अनिती कम व्हईन आनी लोकं नितीथून वागथीन. जगम्हा थोडीफार नितीमत्ता शे म्हनीसन हाई जग चाली राहिनं.

पंढरपूरनी जत्राले वारीम्हा चालनारा वारकरी तं असं मानतस, की पांडुरंग तेस्ना बरोबर रहास वारी म्हा. वारी जशी पंढरपूर भिडस, तसा मंदिरम्हातला ईठोबा मंदिर सोडी वारकरीस्मा खेवाले निंघी जास. त्या म्हंतसज्ना.

रिकामा गाभारा, भक्त त्या चिंताम्हा,

रवस वारीम्हा, पांडुरंग !

खरंज शे. माना तं देव शे. मंग, तो भक्तना मदतले ईसन उभा ऱ्हास. पन तो बी भक्तस्ले सांगस. काम-कष्ट करा. प्रयत्न करा. निकाम्याले तोबी मदत करत नही. महाभारतना युध्द म्हा भगवान श्री कृष्ण अर्जुन ना सखा, नातावाईक व्हता. पन तेन्ही अर्जुनलेज युद्ध कराले लावं. तेन्ही फक्त मार्ग दावा. भक्तकडथून काम करी लिन्ह. कोन्ही कर्म करं, की तो फय देसच. तो म्हनसज नां.

तुम्ही कर्म करत रहा, मी फय देसू,

व्हयीन गरज तव्हय, मी मदतले येसू.

म्हनीसन देवले नही, तं त्या नियंताले मानालेज जोयजे. असं माले मनोमन पटनं. थोडं चालीसन दोन्ही आंधाराम्हाज घरकडे परतनूत. मारुतीनां मंदिरफान उनूत. आनी अचानक लाईन उनी. एकदम उजायं पडनं. पुतण्या.. भारी खुश व्हयना. मंदिरम्हा आते परकाश व्हता. बजरंगबली दिखी ऱ्हायन्ता. आम्ही दोन्हीस्नी भक्तीभावथून हात जोडात. मारुती मजानं हासी ऱ्हायना, असा माले भास व्हयना. मंदिरम्हा तं उजायं पडेलज व्हतं. मन्हा हिरदम्हा बी इचारस्नं उजायं पडनं. आते मार्ग, लख्ख चमकी ऱ्हायन्ता. आम्ही निचित मनथून घरकडे निंघनूत.

- बी.एन.चौधरी, धरणगाव

Web Title: God bless you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.