भुसावळातील खरात कुटुंबियांवरील हल्ल्यामागे गॉड फादर कुटुंबियांचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:00 PM2019-10-11T22:00:57+5:302019-10-11T22:01:31+5:30
सीआडी चौकशीची मागणी
भुसावळ : येथील नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह परिवारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. मात्र स्थानिक पोलिसांवर नाही. या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी खरात यांच्या परिवाराने पत्रकार परिषदेत केली आहे. या घटनेत केवळ तीनच आरोपी नसून १० ते १२ आरोपी असल्याचा आरोप करुन त्यांच्या मागे गॉड फादर असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. परिवाराला लवकर न्याय मिळण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी त्यांनी केली.
येथील संमतानगर भागातील हल्ल्यात ठार झालेले भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजकुमार खरात, अमित खरात, लल्ला मोरे, हंसराज खरात, रजनी रवींद्र खरात यांच्या कुटुंबिय उपस्थित होते.
घटनेसंदर्भात माहिती देतांना त्यांनी सांगितले की ६ रोजी ९.१४ मिनिटांच्या सुमारास आम्ही मंडळाच्या कार्यक्रमात होतो. त्यावेळी राजन यास सोनल व प्रेमसागर यांच्यावर काही लोक तलवार बंदुकीने हल्ला करित आहे. यात ते मरण पावतील असा फोन केला. त्यामुळे आम्ही लालचर्च जवळ धाव घेतली. यावेळी सोनू दुभाजकाजवळ पडलेला होता. तर प्रेमसागर जखमी होता तो पप्पांना वाचव असे सांगत होता. यानंतर आम्ही रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका ओमनीतून भावंडांना आधी डॉ. तुषार पाटील, गिरिजा हॉस्पिटल, नंतर डॉ. निलेश महाजन, प्रभावती हॉस्पिटल तर शेवटी डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात नेले. त्यावेळी दोघांना मृत घोषित करण्यात आले. तर इकडे घराकडे हल्लेखोरांनी वडिल रवींद्र खरात, आई, काका व भावावरही हल्ला चढविला. यावेळी वडील जवळच्या घरात घुसले तेथे त्यांच्यावर हल्ला चढविला व लहान भाऊ हंसराज (ऋतीक) याच्या पायावर राज बॉक्सर याने दोन गोळ्या झाडल्या त्याने त्या चुकविल्या नंतर तीसरी त्याच्या पाठीवर लागली.
पोलीस लवकर आले नाही
हल्ल्यानंतर बहिण राजनंदीनी ही धावत शहर पोलिस ठाण्यात गेली मात्र पोलिस दोन-अडीच तास घटनास्थळी दाखल झाले नसल्याचा आरोप परिवाराने केला आहे. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर आरोपींनी ‘बॉस काम झाले’ असे सांगून गाडी पाठवा असे सांगितले. त्यानंतर तीघे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद होवू नये म्हणुन कवाडे नगरातून नदीवर पोहचविण्यात आले. तेथून ते जळगाव येथे एलसीबी कार्यालयात जमा झाले. शहर किंवा बाजारपेठ पोलिसात ते हजर का झाले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान चौथ्या आरोपीसही पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. तसेच घटनेत आरोपी तीन नसून तीन गाड्यांवर आले होते. ते १० ते १२ जण असावेत.
शस्त्र आली कोठून
अटक करण्यात आलेले आरोपी सर्व साधारण कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे बंदुका, थैली भर गोळ्या, चॉपर आले कोठून असा प्रश्न उपस्थित करत त्यांचा बॉस कोण? याचा शोध पोलिसांनी घ्यावा. आम्हाला कुणाचे नाव घ्यायचे नाही. बदलाही घ्यायचा नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा देवून परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
२७ मिनिटे दिली झुंज
रजनी खरात-दरम्यान मारेकऱ्यांनी पती, दीर व मुलासह आपल्यावर हल्ला करित असतानना तब्बल २७ मिनिटे आपन त्यांच्याशी झुुंज दिली. यात मारेकºयांनी डोक्यावर, डाव्या दंडावर बंदुकीने तर गळ्यावर चाकूने वार केला आहे. शिवाय तळ पायावरही लाथांनी मारहान केली. यावेळी आपण परिवाराचा जीव वाचविण्यासाठी हल्लेखोरांसमोर विनवणीही केली होती.