भुसावळ येथे गोगा नवमीनिमित्त छडी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:40 AM2018-09-05T00:40:42+5:302018-09-05T00:41:41+5:30

दुचाकी रॅलीचे स्वागत

Goga Navamennit Raid procession at Bhusawal | भुसावळ येथे गोगा नवमीनिमित्त छडी मिरवणूक

भुसावळ येथे गोगा नवमीनिमित्त छडी मिरवणूक

googlenewsNext

भुसावळ, जि.जळगाव : वीर गोगादेव चौहाण यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील वाल्मीक नगरापासून मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली तर सायंकाळी छडी मिरवणूक काढण्यात आली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते छडीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. भगतांसह उस्ताद खलिपा, मैल मुक्तीयार, टिकायती यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यंदा १३ छड्यांंची एकाच वेळी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक संतोष बारसे, अर्जुन खरारे आदी उपस्थित होते. बाजारपेठचे नूतन निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्यासह युवा नेतृत्व व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीही छडीचे पूजन केले. प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आठवडे बाजार, डेली मार्केट, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जुनी नगरपालिका, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे ही रॅली पुन्हा मूळ जागी पोहोचली. नगरसेवक पिंटू कोठरी व नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांनी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत माजी नगरसेवक संतोष बारसे, उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे, अर्जुन खरारे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गोगादेव जयंतीनिमित्त आठवडे बाजार नृसिंह मंदिराजवळ जहारवीर गोगादेव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. प्रसंगी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पप्पू बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, युवा नेते धीरज बारसे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक रमेश नागराणी, लल्ला देवकर, सुनील पवार यांच्याहस्तेही पूजन करण्यात आले. याप्रसंगी लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला.

Web Title: Goga Navamennit Raid procession at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.