राजकारणातून बाहेर पडलोय, आता नव्या दमाचा सिनेमा बनविणार - गोविंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 11:58 AM2017-05-15T11:58:35+5:302017-05-15T11:58:35+5:30
खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही
चंद्रकांत जाधव / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - मी खासदार झालो. राजकारणात काम केले, पण खासदरकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी कधीही राजकारणाबाबत बोललो नाही, पुढेही राजकारणात जाण्याचाही विचार नाही. आता नव्या दमाचा सिनेमा बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सिनेअभिनेता गोविंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गोविंदा यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला संवाद असा..
प्रश्न - आपण हत्या हा दमदार सिनेमा बनविला. पण यानंतर असा सिनेमा आला नाही. कुठल्या प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे?
गोविंदा - हत्या हा सिनेमा आम्ही किंवा आमच्या गटाने मिळून बनविला. यानंतर असा सिनेमा आला नाही हे सत्य आहे. परंतु मी नवा आशय, विषयाच्या शोधात आहे. काही नवीन मिळते का, हे पाहूयात.
प्रश्न - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत काय मत आहे?
गोविंदा - मोदी सरकारला तीन वर्षे होत आहेत. पण सरकारच्या कामगिरीविषयी मी बोलणे योग्य नाही. मी कधी कुण्या नेत्याविषयीदेखील काही भाष्य कधीच नाही.
प्रश्न - जळगावविषयी आपले काय मत आहे?
गोविंदा - जळगावमध्ये माङो अनेक चाहते आहेत. त्यांच्याकडून सतत प्रेम मिळते. यापूर्वीही मी एकदा जळगावात आलो होतो. त्या वेळेस जसा मला चाहत्यांचा प्रतिसाद, प्रेम मिळाले. तसेच प्रेम आताही मिळाले.
भविष्यात लोकसभा निवडणूक लढणार का?
माझी छोरा विरार का, अशी प्रतिमा आहे. मी चाहते, प्रेमींच्या आग्रहामुळे निवडणूक लढलो. पण माझा खासदारकीचा कार्यकाळ आटोपल्यानंतर मी कधी राजकारण या विषयाबाबत बोललो नाही. मी राजकारणातून आता बाहेर पडलोय. पुन्हा निवडणूक हा मुद्दाच नाही.