जळगावात विद्यार्थ्यांनी बनवली ‘गोकार्ट’ रेसिंग कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:29 PM2018-04-03T17:29:53+5:302018-04-03T17:29:53+5:30
पुणे येथील राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत यशस्वी सहभाग
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि - ३ येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ११० किलोग्रॅम वजनाची व एक तासाच ८० किमीचे अंतर पार करणारी अनोखी रेसिंग कार तयार केली आहे.
पुणे येथील शासकीय आर.टी.ओ ट्रॅक येथे झालेल्या राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी ४५ संघांमध्ये त्यांना गोकर्ट कडून ठरलेल्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
एक समान रस्त्यावर चालणारी ही कार आहे. अचानक ब्रेक लावून थांबविणे, पुढच्या सेकंदाला पुन्हा वेगाने स्पर्धा करणे असे वेगळे अनुभव देणारी ही कार आहे. आॅटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप यांच्या तर्फे आयोजित पुणे येथे चित्तथरारक रेसिंग स्पर्धा पार पडली. यावेळी ५ किमी अंतराचा थरारक ट्रॅक तयार करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी आॅगस्ट २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान महाविद्यालयातील वर्कशॉपमध्ये ही कार तयार केली आहे. कार बनविण्यासाठी दुचाकीचे १२५ सीसी इंजिन व ब्रेक पद्धती वापरली आहे. स्पर्धांमध्ये विना अपघात निर्धारित वेळेत होणाऱ्या ब्रेक टेस्टिंग, ड्रग रेसिंग, नाईट रेसिंग, आॅटो क्रॉस रेसिंग व स्किड पेड रेसिंग या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून सहभाग नोंदविला.
या विद्यार्थ्यांनी तयार केली कार
ड्रायव्हर विवेक वाणी, प्रतिक भावसार, स्टेअरिंग हेड ललित बाविस्कर, हेमंत चौधरी, अक्षय जैस्वाल, महेंद्र चौधरी, ट्रान्समिशन - जयंत बोरसे, निखील चौधरी, वैभव पाटील, वैभव डीमरी, ब्रेक - हितेश क्षीरसागर, अमोल ताडे, अक्षय अमृतकर, सचिन कोल्हे, ललितकुमार माळी, डिझाईन- सोपान कडू, यश फुले( कॅप्तन), सहाय्यक - यश भावसार, दीपक भदाणे, दुर्गेश चौधरी, जयेश नेहेते, गणेश राठोड, प्रशांत पाटील, शाम शिंदे, शुभम बोरसे या विद्यार्थ्यांनी ही गोकार्ट रेसिंग कार तयार केली आहे. मार्गदर्शक म्हणून प्रा. तेजस भिरूड, प्रा.दत्तात्रय चोपडे होते.