एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली
By विजय.सैतवाल | Updated: June 8, 2024 17:24 IST2024-06-08T17:22:13+5:302024-06-08T17:24:52+5:30
दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, शनिवारी (दि. ८) एकाच दिवसात सोने एक हजार ४०० रुपयांनी घसरले.

एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त! दर ७१,५०० रुपये प्रतितोळ्यावर, चांदीही ६०० रुपयांनी घसरली
विजयकुमार सैतवाल, जळगाव : दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, शनिवारी (दि. ८) एकाच दिवसात सोने एक हजार ४०० रुपयांनी घसरले. यामुळे ते ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच १ जून रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. गुरुवारी (दि. ६) त्यात पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार १०० रुपयांवर पोहोचले. ७ रोजी त्यात २०० रुपयांची घसरण होण्यापाठोपाठ ८ रोजी थेट एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
दुसरीकडे दोन दिवसांत तीन हजार ६०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी (दि. ८) ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.