सोने- चांदी महागली; सोने ७२,८०० तर चांदी ८३,५०० रुपयांवर
By विजय.सैतवाल | Published: April 15, 2024 05:51 PM2024-04-15T17:51:01+5:302024-04-15T17:51:45+5:30
गेल्या दीड महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे.
विजयकुमार सैतवाल, जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोमवार, १५ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तसेच चांदीच्या भावातही २०० रुपयांची वाढ होऊन ती ८३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
गेल्या दीड महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. त्यामुळे दोन्हीही मौल्यवान धातू भावामध्ये नवनवीन उच्चांक गाठत आहेत. यामध्ये गेल्या आठवड्यात सोने ७२ हजारांवर पोहचले तर चांदी ८३ हजारांवर पोहचली होती. शनिवार, १३ एप्रिल रोजी सोने ७२ हजार ५०० रुपये झाले. त्यात सोमवार, १५ एप्रिल रोजी ३०० रुपयांची वाढ झाली व सोने ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले. शनिवारी चांदी ८३ हजार ३०० रुपयांवर होती, त्यात सोमवारी २०० रुपयांची वाढ होऊन ती ८३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.