Gold Rates: लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी वधारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:30 AM2020-11-15T05:30:30+5:302020-11-15T07:03:24+5:30
Gold Rates: खरेदीचा उत्साह; सोने ४०० रुपयांनी वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विजयादशमी व धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भाव कमी झालेल्या सोन्या-चांदीचे भाव लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वधारले. सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ होवून ते ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळा तर चांदीच्या भावात एक हजार रुपययांनी वाढ होऊन ती ६४,५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली. मागणी वाढण्यासह डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात दिवाळी सणानिमित्त मागणी वाढलेली असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. भाऊबीज व त्यानंतरही सोने-चांदी खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे. लग्नसराईच्या काळात भाववाढ होण्याच्या शक्यतेने ग्राहक सोने चांदी खरेदी करीत आहेत.