सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

By विजय.सैतवाल | Published: March 20, 2023 05:36 PM2023-03-20T17:36:30+5:302023-03-20T17:36:48+5:30

या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शनिवारी नागपूर येथे सोने ६० हजार १०० रुपयांवर होते. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे. 

Gold crosses 60,000 mark, forecast to continue rising till new high Gudipadva | सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

googlenewsNext

जळगाव - गेल्या १० दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोन्याच्या भावामध्ये सुणर्वनगरी जळगावात  सोमवार, २० मार्च रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ होऊन सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला. या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शनिवारी नागपूर येथे सोने ६० हजार १०० रुपयांवर होते. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे. 

दरम्यान, दोन दिवसांवर आलेल्या गुढीपाडवा सणापर्यंत ही भाववाढ कायम राहत मुहूर्तावर आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

अमेरिकन बँका डबघाईला आल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढू लागली व त्यांचे भाव वाढत आहे. १० मार्चपासून अधिकच भाववाढ होत असल्याने शनिवार, १८ मार्च रोजी जळगावात सोने ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळा या उच्चांकीवर भावावर पोहचले होते. सोमवार, २० मार्च रोजी त्यात आणखी ४०० रुपयांची भर पडून सोन्याने प्रथमच ६० हजारांचा टप्पा ओलांडला व ते ६० हजार २०० रुपयांवर पोहचले. चांदीमध्येदेखील ५०० रुपयांची वाढ झाल्याने ती ६९ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली.  

मुहूर्ताच्या भावाकडे लक्ष

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण दोन दिवसांवर आला असून त्या दिवशीदेखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. त्यामुळे मुहूर्तावर आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी २२ मार्चपर्यंत सोने काय भावावर पोहचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Gold crosses 60,000 mark, forecast to continue rising till new high Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं