मोठ्या भाववाढीनंतर सोने चांदीत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:35+5:302021-05-28T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुढीपाडवा व अक्षयतृतीयापासून कमोडिटी मार्केटमध्ये भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीत गुरुवार, २७ मे रोजी मोठी ...

Gold falls to silver after big price rise | मोठ्या भाववाढीनंतर सोने चांदीत घसरण

मोठ्या भाववाढीनंतर सोने चांदीत घसरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गुढीपाडवा व अक्षयतृतीयापासून कमोडिटी मार्केटमध्ये भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीत गुरुवार, २७ मे रोजी मोठी घसरण झाली. यात सोने ६०० रुपयांनी घसरून ४८ हजार ६२० रुपये प्रति तोळ्यावर आले तर चांदीत १३०० रुपयांनी घसरून ती ७१ हजार ४०० रुपये प्रति किलोवर आली. विशेष म्हणजे गुरुवारी खरेदी पेक्षा विक्रीकडे अधिक कल असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यानंतर सातत्याने भाववाढ होत गेली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने ४७ हजार ७०० रुपये तर चांदी ७१ हजार २०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतरही ही भाववाढ सुरूच राहून २६ मे पर्यंत सोने ४९ हजार २२० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले तर चांदीदेखील ७२ हजार ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र गुरुवार, २७ मे रोजी दलालांमार्फत अचानक विक्री सुरू झाली व सोने चांदीचे भाव गडगडले.

यामध्ये सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ६२० रुपये प्रतितोळयावर आले. तर चांदीदेखील १३०० रुपयांनी घसरून ७१ हजार ४०० रुपये प्रति किलोवर आली.

विक्रीचे अधिक प्रमाण

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लाॅकडाऊन दरम्यान व यंदादेखील निर्बंधा दरम्यान सोने चांदीत गुंतवणूक वाढून खरेदीचे अधिक प्रमाण असल्याचे दिसून आले. मात्र गुरुवार, २७ मे रोजी खरेदीचे प्रमाण ३९ टक्के तर विक्रीचे प्रमाण ५७ टक्के होते. याशिवाय ४ टक्के थांबलेले व्यवहार (होल्ड) होते. दरम्यान, सोने-चांदीच्या भावात घसरण झाली असली तरी हे भाव पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

Web Title: Gold falls to silver after big price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.