उच्चांकानंतर पाच दिवसांत सोने २०००, तर चांदी ४००० ने घसरले; जाणून घ्या शनिवारचा भाव

By विजय.सैतवाल | Published: December 9, 2023 10:22 PM2023-12-09T22:22:42+5:302023-12-09T22:23:27+5:30

शेअर बाजार उसळी घेत असल्याने हे भाव कमी होत असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

Gold fell 2,000 and silver 4,000 in the five days after the high; Know Saturday prices | उच्चांकानंतर पाच दिवसांत सोने २०००, तर चांदी ४००० ने घसरले; जाणून घ्या शनिवारचा भाव

उच्चांकानंतर पाच दिवसांत सोने २०००, तर चांदी ४००० ने घसरले; जाणून घ्या शनिवारचा भाव


जळगाव : पाच दिवसांपूर्वी ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात शनिवार, ९ डिसेंबर रोजी ६५० रुपयांची घसरण होऊन ते ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे. चांदीमध्येदेखील ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार रुपये प्रतितोळ्यावर आली आहे. पाच दिवसांमध्ये सोने दोन हजार आणि चांदी चार हजार रुपयांनी घसरली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर वाढत असताना सोने-चांदीचे भाव कमी झाले आहे. शेअर बाजार उसळी घेत असल्याने हे भाव कमी होत असल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

दोन आठवड्यांपासून सोने-चांदीचे भाव वाढत गेले. त्यामुळे ४ डिसेंबर रोजी सोन्याने ऐतिहासिक उच्चांकी गाठत ते ६४ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी ५ डिसेंबर रोजी एक हजार ३०० रुपयांची घसरण झाल्याने सोने ६३ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले. ६ रोजी २५० रुपयांनी घसरण झाली. मात्र, ७ रोजी ५० रुपये आणि ८ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोने ६२ हजार ९५० रुपयांवर पोहचले. मात्र, ९ रोजी ६५० रुपयांची घसरण झाली व सोने ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर आले. पाच दिवसांतील सोन्याची स्थिती पाहता त्यात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. अशाच प्रकारे चांदीच्या भावातही चढ-उतार होऊन चांदीत पाच दिवसांत चार हजार रुपयांची घसरण झाली आहे.

अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८३.४३ रुपयांवर पोहोचले असले तरी सोने-चांदीचे भाव कमी होण्यास शेअर बाजारातील उसळी कारणीभूत असल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Gold fell 2,000 and silver 4,000 in the five days after the high; Know Saturday prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.