सोने सकाळी ५५० ने घसरले; दुपारी पुन्हा दीडशेने वाढले!
By विजय.सैतवाल | Published: April 2, 2024 05:35 PM2024-04-02T17:35:32+5:302024-04-02T17:36:11+5:30
६९ हजारांवर भाव : चांदी ७६ हजारांवर स्थिर.
विजयकुमार सैतवाल, जळगाव : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ९०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २ एप्रिल रोजी सकाळी ५५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६८ हजार ८५० रुपयांवर आले. मात्र, दुपारी त्यात पुन्हा १५० रुपयांची वाढ झाल्यामुळे सोने ६९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. चांदी मात्र ७६ हजार रुपये प्रति किलोवर कायम आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला मोठी मागणी वाढत असल्याने त्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे १ एप्रिल रोजी सोने ६९ हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र, मोठी वाढ असल्याने ते स्थिरावत जाऊन मंगळवारी सकाळी त्यात ५५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६८ हजार ८५० रुपये प्रति तोळ्यावर आले. पुन्हा मागणीचा परिणाम होऊन दुपारी त्यात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.