सोने आठशेने घसरले, चांदी तीनशेने वधारली, सोने ७४,३०० रुपये तोळा, चांदी ९२,८०० रुपयांवर
By विजय.सैतवाल | Published: May 21, 2024 05:49 PM2024-05-21T17:49:03+5:302024-05-21T17:49:10+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. त्यामुळे चांदीने तीन दिवसांपूर्वीच ९० हजारांचा पल्ला गाठला.
जळगाव : चांदीच्या भावात वाढ सुरूच असून मंगळवार, २१ मे रोजी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. दुसरीकडे सोन्याच्या भावात मात्र ८०० रुपयांची घसरण होऊन ते ७४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. त्यामुळे चांदीने तीन दिवसांपूर्वीच ९० हजारांचा पल्ला गाठला. सोमवार, २० मे रोजी तर त्यात थेट दोन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. मंगळवार, २१ मे रोजी भाववाढ कायम राहत पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी आता ९३ हजारांच्या जवळ पोहोचली आहे.
दुसरीकडे सोमवार, २० मे रोजी ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २१ मे रोजी ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ७४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दलालांनी चांदीची खरेदी वाढवल्याने तिचे भाव वाढत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.