२६ दिवसात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:02 PM2018-12-27T13:02:55+5:302018-12-27T13:03:34+5:30

सततच्या चढ-उताराने भाव अस्थिर

Gold has gained 1200 rupees in 26 days | २६ दिवसात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ

२६ दिवसात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ

Next

जळगाव : गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीनंतर या आठवड्यात पुन्हा सोन्याच्या भावात तेजी आली असून सोन्यातील सततच्या चढ-उतारामुळे भाव दररोज भाव अस्थिर राहत असल्याचे चित्र सुवर्णनगरी जळगावात आहे. गेल्या २६ दिवसात सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली असून सोने पुन्हा एकदा ३२ हजाराच्या पुढे गेले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी-जास्त होत असल्याने भारतातही सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे.
दररोज चढ-उतार
महिनाभरापासून दररोज सोन्यामध्ये दररोज १०० ते २०० रुपये प्रती तोळ््याने चढ-उतार होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात २०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३१ हजार १०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर अशीच वाढ सुरू राहून ४ डिसेंबर रोजी सोने ३१ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा ५ रोजी सोने ३१ हजार ४०० रुपये, ६ रोजी ३१ हजार ७०० रुपये, ७ रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले आणि ८ डिसेंबर रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा झाले होते. १० डिसेंबर रोजी ते ३२ हजार ४०० रुपयांवर पोहचले. मात्र त्यानंतर घसरण होत जावून ११ रोजी सोने ३२ हजार ३०० रुपये झाले व १२ रोजी त्याच भावावर ते स्थिर राहिले. त्यानंतरही १३ रोजी पुन्हा १०० रुपये प्रती तोळ््याने सोन्याचे भाव कमी होऊन ते ३२ हजार २०० रुपये झाले आणि १४ रोजी ते ३२ हजारावर आले. त्यानंतर १५ ते २० डिसेंबर दरम्यान ते ३२ हजार रुपये प्रती तोळ््यावर स्थिर होते. त्यानंतर सोन्याच्या भावात पुन्हा घसरण होऊन ते ३२ हजाराच्या खाली आले आणि २१ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव ३१ हजार ९०० रुपये प्रती झाले. तीन दिवस ते स्थिर राहून पुन्हा २४ रोजी ३२ हजारावर पोहचले व २५ रोजी पुन्हा १०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन सोने ३२ हजार १०० रुपये झाले. २६ रोजी देखील सोने ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा होते.
सोन्या मागणी कायम
सोन्याचे भाव कमी-जास्त होत असले तरी ग्राहकीवर त्याचा काही परिणाम नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. सध्या लग्न सराईमुळे सोन्याला मागणी वाढली असून दररोज ग्राहकांची सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

सोन्याच्या भावामध्ये दररोज चढ-उतार होत असला तरी ग्राहकीवर त्याच्या काही परिणाम नाही. सध्या लग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढली आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold has gained 1200 rupees in 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.