सलग दुसऱ्याही दिवशी सोने स्वस्त, पण पुन्हा महागणार!

By अमित महाबळ | Published: December 6, 2023 07:44 PM2023-12-06T19:44:29+5:302023-12-06T19:44:55+5:30

असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.

gold is cheap for the second day in a row but will be expensive again | सलग दुसऱ्याही दिवशी सोने स्वस्त, पण पुन्हा महागणार!

सलग दुसऱ्याही दिवशी सोने स्वस्त, पण पुन्हा महागणार!

अमित महाबळ, जळगाव : लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असताना सोने व चांदीचे दर सलग दुसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. बुधवारी सोने प्रतितोळा ६२,७५० आणि चांदी प्रतिकिलो ७५,१०० असा दर होता. याआधी झालेल्या दरवाढीच्या तुलनेत होणारी घट कमी आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा दरवाढ होईल, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे.

मंगळवारी, बाजार उघडल्यावर सोन्याचे दर १,३०० रुपयांनी कमी झाल्याने ते प्रतितोळा ६३ हजार रुपये झाले होते. चांदी दोन हजार रुपयांनी कमी झाल्याने प्रतिकिलो दर ७६ हजार रुपयांवर खाली आले होते. यानंतर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने २५० रुपयांनी आणि चांदी ९०० रुपयांनी कमी झाली. त्यामुळे सोने प्रतितोळा ६२,७५० व चांदी प्रतिकिलो ७५,१०० असा दर होता.

डिसेंबरअखेर राहतील एवढे दर...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याबद्दल सुवर्ण व्यावसायिक आदित्य नवलखा म्हणाले, की यापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी दर वाढले होते, कमी होताना १२००-१३०० रुपयांनी घट झाली आहे. पुढील आठवड्यात दर पुन्हा वाढतील. चालू वर्षाच्या डिसेंबरअखेरपर्यंत सोन्याचे दर ६४ हजारपेक्षा अधिक होऊ शकतात, असा अंदाज आहे.

Web Title: gold is cheap for the second day in a row but will be expensive again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.