सुवर्णपदक विजेता धावपटू करतोय चरितार्थासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 09:18 PM2017-08-28T21:18:34+5:302017-08-28T21:31:15+5:30

ऑलिम्पीकमध्ये धावलेला वाकोदचा केतन संचेती गावात आजकाल किराणाची टपरी चालवित आहे.

The gold medal winner is running a struggle for charity | सुवर्णपदक विजेता धावपटू करतोय चरितार्थासाठी संघर्ष

सुवर्णपदक विजेता धावपटू करतोय चरितार्थासाठी संघर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देलहानपणी मानसिकदृष्टय़ा सक्षम नसतांनाही जिद्दीच्या जोरावर मिळवले होते यश2007 साली चीनमधील शांघाय येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत केतनने मिळविले होते सुवर्णपदक

अर्पण लोढा लोकमत ऑनलाईन वाकोद ता. जामनेर : लहानपणी पाहिजे तसा बौद्धिक विकास झालेला नसतांनाही, योग्य मार्गदर्शन मिळाल्याने चीनमधील शांघाय येथे 2007 साली झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये 4 बाय 100 मिटर (रिले) धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारा येथील 24 वर्षीय केतन संचेती हा युवक मात्र आज चरितार्थासाठी संघर्ष करीत आह़े पुढील मार्गदर्शन न मिळाल्याने क्रीडा क्षेत्रातून बाहेर पडलेल्या चेतनने गावातील विद्यालयाच्या समोरच असलेल्या घराजवळ एक छोटीशी टपरी टाकून आपला व परिवाराचा रहाटगाडा चालविण्याचा प्रय} चालविला आहे.़ यशाची विलक्षण कहाणी केतनच्या यशाची कहाणी तशी विलक्षण आहे. जैन फार्महाऊस मधील कर्मचारी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे वडील मुकेश संचेती कार्यरत असून त्यांची परिस्थिती सामान्यच आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून त्यांचा मोठा मुलगा केतन त्यावेळी मानसिकदृष्टय़ा सक्षम नसतांना देखील तो जगासमोर एक वेगळे उदाहरण म्हणून आदर्श ठरला. 2005 मध्ये त्याच्या कुटूंबियानी जड अंत:करणाने केतनला शेगाव येथील गजानन महाराज मतिमंद विद्यालयात शिक्षणासाठी पाठविल़े स्वभावाने जिद्दी असलेल्या केतनमधील खेळाडू वृत्तीचे गुण तेथील शिक्षकांनी हेरले व तेव्हापासून ते केतनला हळूहळू विविध खेळात सहभागी करून घेत गेल़े, त्यांनी त्याला धावण्याची सवय लावली आणि त्यातून एक चांगला धावपटू तयार झाला़ या मतिमंद विद्यालयात वयाने मोठय़ा असलेल्यांना सुद्धा केतन जिद्दीने मागे टाकत सतत पुढे धावत गेला़ या संस्थेकडून दिल्ली येथे झालेल्या रिले स्पर्धेत केतनला सहभागी करण्यात आल़े स्पर्धेत केतनने चमक दाखवत तीन सुवर्ण पदक मिळविले. तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित व सिने अभिनेता अक्षयकुमार यांच्या हस्ते केतनला गौरविण्यात आले होत़े यानंतर बंगळुरू व गोवा या ठिकाणी त्याला सरावासाठी पाठविण्यात आल़े दोन वर्षाच्या कठीण मेहनतीनंतर 2 ते 11 ऑक्टोबर 2007 या दरम्यान शांघाय येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत केतनला सहभागी करण्यासाठी प्रय} करण्यात आला आणि संस्थेचा हा प्रय} अक्षरश: यशस्वी झाला़ केतनसह त्याचे प्रशिक्षक चीनला रवाना झाल़े आणि तेथील ऑल्ॅिम्पिक मधील 4 बाय ़100 मीटर रिले धावण्याच्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्ण पदक मिळवल़े त्याने यावेळी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदके मिळवली. जैन उद्योग समुहाने केले कौतुक वाकोद येथील जैन उद्योग समुहातर्फे केतन याचे यशाबद्दल कौतुक करून त्याला समूहाकडून विशेष मार्गदर्शन मिळत गेल़े तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून मदतही करण्यात आली.़ सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्यानंतर जळगावातील जैन हिल्स येथे केतनचा उद्योगपती स्व़ भवरलाल जैन यांच्याहस्ते सत्कारही करण्यात आला होता. पुढील वाटचाल थांबली.. परंतु काही काळ लोटल्यानंतर योग्य मार्गदर्शनाअभावी क्रीडा क्षेत्रात केतनला पुढील वाटचाल करता आली नाही, पुढे त्याचा सर्वानाच विसर पडला आणि आज तो उदरनिर्वाहासाठी टपरी चालवित असल्याचे वैषम्य मात्र गावक:यांना वाटत असते.

Web Title: The gold medal winner is running a struggle for charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.