खान्देशातील ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:21+5:302021-04-24T04:16:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ सोमवार, ३ मे रोजी ...

Gold medals for 99 students from Khandesh | खान्देशातील ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

खान्देशातील ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ सोमवार, ३ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून केले जाणार आहे. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी नुकतीच विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केली असून, ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्‍यात येणार आहे.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन असतील. कार्यक्रम ऑनलाईन असल्यामुळे याचे थेट प्रक्षेपणसुद्धा केले जाणार आहे. दुसरीकडे आता विद्यापीठाने सुद्धा सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामध्‍ये ९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

असे आहेत सुवर्णपदक विजेते

विविध महाविद्यालयांतील ९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात येणार असून, त्यामध्ये काजल चोपडे (एमसीए), राजश्री चौधरी (एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स), माधुरी बोरसे (एम.एस्सी. कॉम्प्युटर), जागृती मराठे (एम.एस्सी. फिजिक्स), कोमल देशमुख (एम.एस्सी. पर्यावरणशास्त्र), खान उझमा विकार अहमद (एम.एस्सी. गणित), मयूरसिंग गिरासे (एम.एस्सी. पौलीमर केमिस्ट्री), निकिता पटेल (एम.एस्सी. पाॅलीमर केमिस्ट्री), प्रियंका पोपटाणी (एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री), मयूरसिंग गिरासे (एम.एस्सी. केमिस्ट्री), प्रियंका पोपटाणी (एम.एस्सी. केमिस्ट्री, सर्व शाखा), चांदणी सूर्यवंशी (एम.एस्सी. इन ऑर्गनिक केमिस्ट्री), चांदणी सूर्यवंशी (एम.एस्सी. केमिस्ट्री), आयेशा सिद्दिकी खानूम साजिदुल्ला खान (एम.एस्सी. बायोटेक्नोलॉजी), राजकमल पाटील (एम.एस्सी. मायक्रो बायोलॉजी), अनामिका पात्रा (एम.एस्सी. बायोकेमिस्ट्री), मोहिनी झांबरे (एम.एस्सी. पेस्टीसाईडस् व अ‍ॅग्रोकेमिक्ल्स), सुप्रिया पाटील (एम.एस्सी. स्टॅटीस्टिक्स इंडस्ट्रीअल स्टॅटीस्टिक्स), पुष्पा अग्रहारी (एम.एस्सी. आयटी), गायत्री बारी (एम.एस्सी. बॉटनी), पारस चौधरी (एम.एस्सी. मटेरिअल सायन्स), देवश्री बाविस्कर (एम.एस्सी. फिजिक्स एनर्जी स्टडीज), कल्पना माळी (एमए/एमएस्सी भूगोलशास्त्र), सौरभ मुळे (एमएस्सी इंडस्ट्रीयल केमिस्ट्री), निकिता चौधरी (एमएस्सी सर्व विषय), वैभवी शिंपी (बी.एस्सी. फिजिक्स), चिन्मय पाटील (बी.एस्सी. संख्याशास्त्र), अतुल भांडारकर (बी.एस्सी. केमिस्ट्री), सिमरन वालेचा (बी.एस्सी. केमिस्ट्री), उझमा नाझ शेख इकबाल (बी.एस्सी. झूलॉजी), ऐश्वर्या वाणी (बी.एस्सी. बॉटनी), प्रियंका धर्माधिकारी (बी.एस्सी. मायक्रो बायोलॉजी), साक्षी महाजन (बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी), भूषण पाटील (बीएस्सी बायोकेमिस्ट्री), वैशाली सोनवणे (बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स), काजल मराठे (बीएस्सी गणित), नितीश अत्री (बीएस्सी भूगोल), मंगेश पाटील (एम. फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री), स्वाती चव्हाण (एम.फार्मसी फार्माकॉगनॉसी), नुपूर बाहेती (एम. फार्मसी क्वालिटी अ‍ॅश्युरन्स), अक्षय उसारे (बी.फार्मसी), रूचिका चौधरी (बी.फार्मसी), शादाब पठाण (बी.टेक केमिकल इंजिनिअरिंग),पवन पाटील (बी.टेक ऑईल, फॅटस् अ‍ॅण्ड वॅक्सेस), शवी पवार (बी.टेक फुडस्), पारस गुडका (बी.टेक प्लास्टिक), निखिल जगताप (बी.टेक पेंटस्), मानसी जाधव (बीई कॉम्प्युटर), दिव्या परदेशी (बीई), भूषण शिंदे (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स), उत्कर्षा विसपूते (बी.ई. बायोटेक्नॉलॉजी), गौरव बालदी (बी.ई. केमिकल), भूषरा शेख (बी.ई़. सिव्हील), दिव्या परदेशी (बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन), किरण पाटील (बी.ई़. मॅकॅनिकल), आकाश पाटील (बी.ई. ऑटोमोबाईल), सूचिता बिरारी (बीई आयटी), अश्विनी चौधरी (बीई इलेक्ट्रीकल), कल्पेश पाटील (एमबीए), अमातुल्लाह अली असगर बु-हानपूरवाला (एमबीए), रागिनी केशरी (एमबीए फायनान्स), जया नाहाटा (एम.कॉम.), जया नाहाटा (एम.कॉम अ‍ॅडव्हान्स अकौंटन्सी), भारती सूर्यवंशी (बी.कॉम.), भारती सूर्यवंशी (बी.कॉम.), रुचिता फेटे (अधिक गुण), सुरभी गुप्ता (अधिक गुण), आकांक्षा साकलकर (एमए इंग्रजी), अक्षय पाटील (एम.ए. इंग्रजी), रितेश साळुंखे (एम.ए. मराठी), जोत्स्ना कांबळे (एम.ए. मराठी), भावना प्रजापती (एम.ए. हिंदी), किरण सोनवणे (एम.ए. संस्कृत), हर्षा सोनवणे (एम.ए. समाजशास्त्र), नीलिमा भोई (एम.ए. अर्थशास्त्र), शिल्पा चव्हाण (एम.ए. इतिहास), नितीशा सोनवणे (बी.ए.), रवींद्र शिंदे (बी.ए. अर्थशास्त्र) ,शीतल अहिरे (बी.ए. मराठी), उन्झेला नाझ शेख (बी.ए. उर्दु), उन्नती राठोड (बी.ए. संस्कृत), नितीशा सोनवणे (बी.ए. भुगोल), अदनान अहमद शेख (बी.ए. इतिहास), वर्षा चौधरी (बी.ए. हिंदी), किरण पाटील (बी.ए. इंग्रजी), यशवंत चित्ते (एलएलएम), तिरूमला महाजन (विधि अभ्यासक्रम), हिमांशू भावे (३ वर्षीय विधि अभ्यासक्रम), हिमांशू भावे (एलएलबी), चंद्रकांत अग्रवाल (३ वर्षीय विधि अभ्यासक्रम सिव्हील प्रोसिजर कोड अ‍ॅण्ड लिमिटेशन अ‍ॅक्ट विषय), संजना कुकरेजा (विधि अभ्यासक्रम जुना/नवीन), मेघना जोशी (एम.ए. मासकम्युनिकेशन), समाधान वाघ (एम.ए. आंबेडकर विचारधारा), कीर्ती पंचभाई (एमए़. संगीत), पूनम म्हासने (एम.एड्), संगीता नायक (बी.एड. जनरल), अविनाश पाटील (एम.ए. तत्त्वज्ञान).

नऊ विद्यार्थ्यांचा डबल धमाका

खान्देशातील नऊ विद्यार्थ्यांनी दुहेरी यश मिळविले आहे. त्यामध्ये विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस प्रशाळेतील मयूरसिंग गिरासे, नंदुरबारातील जे.एस.एस. संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रियंका पोपटाणी, शिरपूर येथील केव्हीपीएस संस्थेचे पी. डी. माळी कला, एचडी. वाणिज्य व एस.एम.ए. विज्ञान महाविद्यालयातील चांदणी सूर्यवंशी, जळगावातील मू. जे. महाविद्यालयातील गायत्री बारी, पिंपळनेरातील पीईएस संस्थेचे कर्मचारी ए. एम. पाटील, कला, वाणिज्य व अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालयातील वैभवी शिंपी, शिरपुरातील आर. सी. पटेल महाविद्यालयातील दिव्या परदेशी, जळगावातील मू. जे. महाविद्यालयातील जया नाहाटा, शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील भारती सूर्यवंशी, जळगावातील एस. एस. मणियार विधि महाविद्यालयातील हिमांशू भावे यांचा समावेश आहे. या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकाविली आहेत.

Web Title: Gold medals for 99 students from Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.