सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:19+5:302021-01-21T04:15:19+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच असून बुधवार, २० जानेवारीला सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच असून बुधवार, २० जानेवारीला सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहाेचले. मात्र, या वेळी चांदीच्या भावात दोन दिवसांत ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर आली.
सट्टाबाजारात खरेदी-विक्री कमी-अधिक होत असल्याने सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात चार दिवसांपूर्वी ४९ हजार ८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवार, २० जानेवारी रोजी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.
एकीकडे सोन्याच्या भावात वाढ झालेली असताना चांदीच्या भावात मात्र ५०० रुपयांनी घसरण झाली. १८ रोजी ६७ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १९ रोजी ५०० रुपयांनी घसरण झाली व चांदी ६७ हजार रुपये प्रतिकिलोवर आली व २० रोजीदेखील याच भावावर ती स्थिर होती.