रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:09 PM2018-08-02T19:09:54+5:302018-08-02T19:46:02+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या २२ दिवसात सोन्याचे भाव ८०० रुपयांनी कमी झाले असून आठवडाभरात ३०० रुपयांची ही घसरण मानली जात आहे. चांदीच्या भावदेखील घसरले आहेत.
एरव्ही मागणी कमी झाल्याने सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी लग्नसराई झाल्यानंतर हे भाव कमी-कमी होत जातात. त्यात यंदातर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होत असल्याने हे भाव आणखी कमी होत आहे. त्यामुळे सोन्याचे भावदेखील कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.