सोन्याचे दर घसरले; खरेदीची संधी वाढली, पितृ पंधरवाड्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:07 AM2022-09-20T09:07:54+5:302022-09-20T09:08:05+5:30

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले.

Gold prices fell; Increased shopping opportunities | सोन्याचे दर घसरले; खरेदीची संधी वाढली, पितृ पंधरवाड्याचा परिणाम

सोन्याचे दर घसरले; खरेदीची संधी वाढली, पितृ पंधरवाड्याचा परिणाम

Next

जळगाव/नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून ५१ ते ५२ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात पितृ पक्ष सुरू झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी ते ५० हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. यापूर्वी २१ जुलै रोजी सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपयांवर होते. दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण सुरू झाली. तसेच पितृ पक्षात अनेकजण खरेदी टाळत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होत आहेत. १३ सप्टेंबर रोजी ५१ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १४ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सोमवारी त्यात १५० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ४५० रुपयांवर आले. 

चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरता
दुसरीकडे चांदीचे भाव वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी ५६ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली व ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. सोमवारी ती ५७ हजार ५०० रुपयांवर आली.
दिल्लीत सोने ५० हजारांखाली
दिल्लीत सोमवारी सोन्याच्या दरात ३०३ रुपयांची घसरण झाल्यामुळे ते प्रति १० ग्रॅम ४९,५७१ रुपयांवर आले आहे. मागणी कमी आणि रुपयातील घसरणीमुळे दर उतरले, असे तज्ज्ञांनी सांगितले. चांदीच्या दरातही १९७ रुपयांनी घसरण होत ती ५७,२८७ रुपये प्रति किलोवर आली आहे.

Web Title: Gold prices fell; Increased shopping opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.