सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:59 AM2020-02-26T11:59:36+5:302020-02-26T12:00:17+5:30

अतिउच्चांकीवर पोहचल्याने काहीसी नरमाई

Gold prices fell by Rs | सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण

Next

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून सतत भाव वाढ होऊन अतिउच्चांकीवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २५ रोजी ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४३ हजार ८०० रुपयांवरून ४३ हजार २०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र ४९ हजार रुपयांवर स्थिर आहेत.
सोने मोडसाठी गर्दी
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत गेल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच गेले. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण झाल्याने भाववाढीत भर पडत गेली. त्यामुळे सोने कधी नव्हे ते ४३ हजार ८०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीदेखील ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने ग्राहकांचा मोडकडे कल वाढला व सुवर्ण पेढ्यांमध्ये सोने मोडण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे सोमवारी बऱ्याच सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी झाली होती. एकतर भाव एकदम वाढले व सर्वत्र सोने मोडकडे कल वाढल्याने सोन्याच्या भावात काहीसी नरमाई आली. त्यामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात थेट ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन सोने ४३ हजार २०० रुपये प्रती तोळ््यावर आले.
१२ दिवसात मोठी वाढ
१२ दिवसात सोन्याचे भाव तब्बल दोन हजार १०० रुपये प्रती तोळ््याने वाढले होते. १२ फेब्रुवारी रोजी सोने ४० हजार ९०० रुपयांवर होते. त्यानंतर १३ रोजी ४१ हजारावर पोहचले. हळूहळू वाढ होत जाऊन १९ रोजी ४१ हजार ७५० रुपयांवर भाव गेले. २० रोजी ४२ हजार रुपये भाव झाल्यानंतर २१ रोजी पुन्हा ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ४२ हजार ८०० रुपयांवर पोहचले व २२ रोजी तर ४३ हजाराचा टप्पा सोन्याने गाठला. सोमवार, २४ रोजी पुन्हा सोने ८०० रुपयांनी वाढून ते ४३ हजार ८०० रुपयांवर पोहचले. या सोबतच चांदीचेही भाव सतत वाढतच गेले. १३ फेब्रुवारी रोजी ४६ हजार रुपये प्रती किलो असलेल्या चांदीचे भाव १५ रोजी ४७ हजार, १८ रोजी ते ४७ हजार ५००, २० रोजी ४८ हजार रुपये व २१ रोजी ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहचली. २५ फेब्रुवारीपर्यंत ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.
अशा प्रकारे एकदम मोठी वाढ झाल्याने भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. हे भाव अतिउच्चांकीवर पोहचल्याने त्यात मंगळवारी काहीसी नरमाई आली. भाव वाढल्याने अनेकांचा सोन्याच्या मोडकडे कल वाढल्याने त्यासाठी गर्दीदेखील झाली.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.
 

Web Title: Gold prices fell by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव