भावी नवरदेवाला सोन्याची अंगठी, लग्नात डीजे, ट्रिपल तलाक बंद; मनियार बिरादरीच्या वार्षिक सभेत १७ ठराव पारीत
By विलास बारी | Published: September 17, 2023 10:55 PM2023-09-17T22:55:13+5:302023-09-17T22:57:02+5:30
यावेळी तीन तलाक, मोठा साखरपुडा, नवरदेवाला सोन्याची अंगठी व डीजेला बंदीचा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.
जळगाव : जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तीन तलाक, मोठा साखरपुडा, नवरदेवाला सोन्याची अंगठी व डीजेला बंदीचा सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.
सभेत २५ डिसेंबरला सामूहिक विवाह, साखरपुडा मोठ्या प्रमाणात करायचा नाही, साखरपुड्यात भावी नवरदेवला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधूवर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडावर लग्न हॉल बांधावा, व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांची सुरुवात करावी, तसेच शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयंरोजगारासाठी बिरादरीतर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी आदी एकूण १७ ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सय्यद चांद, डॉ. फारूक शेख, रऊफ रहीम, ताहेर इब्राहिम, ॲड. आमीर शेख, गफूर करीम, हकीम चौधरी, रफिक बिस्मिल्ला, इकबाल तकी, रफिक नादर, इब्राहिम बिस्मिल्ला, दगडू वजीर, हाफिझ शेख, कलीम हैदर, अजिज अमीर, मुनाफ महमूद, शब्बीर रशीद व मुदस्सर अल्ताफ, इस्माईल शेख व रियाझ सैयद, वसिम निसार, आरिफ हनीफ आदी उपस्थित होते. रफिक शेख, मौलाना फिरोज, मोहम्मद इद्रिस इकबाल, डॉ. अताउल्ला, हुसेन जनाब, इकबाल वजीर, खलील टेलर, हमीद हवालदार, मुश्ताक हवालदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. अध्यक्ष फारुक शेख यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.
सभेचे कामकाज सचिव अजिज शेख, सूत्रसंचालन असलम शेख, आसिफ शेख, रऊफ शेख, अब्दुल रज्जाक व साजिद सईद यांनी केले. सभेची सुरूवात रफिक खान यांचे कुराण पठणाने झाली. नात अलिना मुख्तार व अलीना साजिद या मुलींनी सादर केली. आभार ताहेर शेख यांनी मानले.