पाच दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदी वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:22+5:302021-02-07T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या सोने-चांदीचे भाव शनिवार, ६ फेब्रुवारी वधारले. यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या सोने-चांदीचे भाव शनिवार, ६ फेब्रुवारी वधारले. यात चांदीत थेट एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजारावर पोहोचली. तसेच सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. सट्टा बाजारातील अस्थिरतेमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात उसळी सुरू असून सोने-चांदीत गेल्या पाच दिवसांपासून घसरण होत होती. मात्र शनिवारी अचानक चांदीत थेट एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. पाच दिवसांच्या घसरणीमुळे सट्टा बाजारात अचानक खरेदी वाढविल्याने ही भाववाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.