‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’मधून उलगडला चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ
By admin | Published: July 2, 2017 11:28 AM2017-07-02T11:28:07+5:302017-07-02T11:28:07+5:30
सदाबहार गीतांनी मंत्रमुग्ध : व.वा. वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणा:या सन 1913 ते 1965 च्या काळातील ‘अजीब दास्तॉ है यह’, ‘मै तो कब से खडी हू’, ‘मधुबन में राधिका नाचे रे’ अशा एकाहून एक सरस गीतांनी रसिक मंगमुग्ध झाले.
व.वा. जिल्हा वाचनालयाच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त रामलालजी चौबे ट्रस्ट व व.वा. वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या गंधे सभागृहात शनिवारी मिलिंद ओक दिग्दर्शित ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यास रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
1945 ते 1965 या काळातील गीते जितेंद्र अभ्यंकर, चेतन कुलकर्णी, अवंतिका पांडे व स्वरदा गोडबोले या गायकांनी सादर केली. तर प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपल्या भारदस्त आवाजाने कार्यक्रमाचे निवेदन करीत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान राहुल सोलापूरकर यांनी प्रत्येक गीताच्या आधी संबंधित चित्रपटाविषयी माहिती दिली. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णयुगाची सुरुवात केव्हा झाली हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलीप कुमार, देव आनंद व राज कपूर यांच्याबाबत अनेक किस्से सांगितले.