सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून बोदवड तालुक्यातील विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:54 PM2018-08-07T23:54:18+5:302018-08-07T23:57:25+5:30
बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी योजनेपासून वंचित असून वारंवार याबाबत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज भरून सुद्धा शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जामठी, ता.बोदवड जि. जळगाव : बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असून त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील जि.प च्या शाळा व इतर शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांसाठी शासनाच्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत पहिली ते चौथीचे तालुक्यात ३७३ विद्यार्थी असून त्यांचे मागणी अनुदान ३,७३००० आहे तर इयत्ता पाचवी ते सातवीचे २०५ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी ३,०७५०० इतक्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. तर इयत्ता आठवी ते दहावीचे ८० विद्यार्थी असून त्यांचे मागणी अनुदान १,६०००० असून मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहे. याबाबत वारंवार मागणी करण्यात येत असूनही त्याकडे गेल्या अनेक वर्षापासून दूर्लक्ष करण्यात येत असल्याने अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पालक वगार्तून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रत्येक शाळांमधून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन व आॅफलाईन पध्दतीने भरून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने या विद्यार्थांच्या थेट बँक खात्यांमध्ये हे अनुदान जमा करण्यात येते. मात्र दरवर्षी विद्यार्थी व पालकांकडून अर्ज भरण्यात येतात परंतु शिष्यवृत्ती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत दखल घेण्याची मागणी आहे .