सोनेरी, चंदेरी झळाळी; खरेदीसह भावही वधारले; सोने ६००, चांदीत एक हजार रुपयांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 07:32 AM2024-10-13T07:32:38+5:302024-10-13T07:33:02+5:30
विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी जळगावात मोठा प्रतिसाद मिळाला.
जळगाव : विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यासह खरेदीही मोठ्या प्रमाणात वाढून सुवर्णनगरीत ग्राहकांनी जणू अस्सल सोन्याचीही ‘लूट’ केली. एक दिवस अगोदर ८०० रुपयांची वाढ झालेल्या सोन्याच्या भावात विजयादशमीला पुन्हा ६०० रुपयांची वाढ होऊन ते ७६ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. या सोबतच चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ९३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला मोठे महत्त्व दिले जाते.
...तरी खरेदीचा उत्साह
-विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी जळगावात मोठा प्रतिसाद मिळाला.
नेहमीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी खरेदी वाढून जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
- मंगलपोत, डिझाईनर सोन्याचे हार व इतर विविध प्रकारचे कलाकुसरीचे दागिने, कर्णफुले यांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेकांनी मुहूर्त साधण्यासाठी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले आहे.