नाश्त्यासाठी गेले अन् चोरटय़ांनी काच फोडून 2 लाख लांबविले
By admin | Published: June 4, 2017 01:01 AM2017-06-04T01:01:36+5:302017-06-04T01:01:36+5:30
मनपा समोरील घटना : मांजरोदच्या व्यापा:याला ‘दणका’
जळगाव : मनपासमोर कार उभी करुन नाश्त्यासाठी गेलेल्या राहूल गोपालदास माहेश्वरी (वय 27 रा.मांजरोद, ता.शिरपूर,जि.धुळे) यांच्या कारची काच फोडून चोरटय़ांनी अवघ्या दहा मिनिटात सीट खाली ठेवलेली दोन लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता मनपासमोर घडली. बॅग लांबविण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
राहूल माहेश्वरी यांचे मांजरोद येथे राहूल ट्रेडींग कंपनी नावाने धान्याचे दुकान आहे. एका शेतक:याचे मक्याचे पैसे द्यायचे असल्याने माहेश्वरी हे दोन लाख रुपये घेण्यासाठी संध्याकाळी साडे सहा वाजता कारने (क्र.एम.एच.18 बी.सी.0240) शहरात आले. बेंडाळे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या गल्लीतून त्यांनी ही रक्कम घेतली व लागलीच तेथून निघाले. माहेश्वरी यांनी रोकड असलेली बॅग क्लिनरच्या दिशेने मागील सीटच्या खाली ठेवली होती.
दहा मिनिटे थांबले नाश्त्यासाठी
मनपासमोर आल्यानंतर माहेश्वरी
मनपाजवळ थांबल्यावर माहेश्वरी यांनी चालक गणेश याला पाण्याची बाटली घेवून येण्याचे सांगितले,मात्र लगेच विचार बदलल्याने आपण दोघं जण नाश्ता करुन येवू असे म्हणत चालकालाही सोबत नेले. जाताना दोघांनी कारचे दरवाजे लॉक केले होते. चालकाला पाणी घेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पाठविले असते तर ही रोकड सुरक्षित राहिली असती. दरम्यान, चालक गणेश हा नाशिक येथे बॅनरचे काम करतो. सध्या गावाला आल्याने राहूल यांनी त्याला चालक म्हणून आणले होते.