दज्रेदार कामांसाठी चांगले कंत्राटदार नेमा- चंद्रकांत पाटील
By admin | Published: July 7, 2017 12:00 PM2017-07-07T12:00:42+5:302017-07-07T12:00:42+5:30
आपल्या कार्यक्षेत्रातील गावांचीही माहिती देऊ न शकल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.7 - कार्यक्षेत्रात गावे किती याची माहितीही अधिकारी सादर करू न शकल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी अधिका:यांना धारेवर धरत कडक शब्दात कानउघाडणी केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेतला. प्रारंभी विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या कामांची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली.
कामाबद्दल नाराजी
या वेळी पालकमंत्र्यांनी काही अधिका:यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गावे किती, कोणती याबाबत माहिती विचारली असता ही माहितीही अधिकारी देऊ शकले नाहीत. यावरून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या तालुक्यातील गावांची माहिती देऊ शकत नसाल तर कामे काय करता? असे नाराजीने त्यांनी विचारले. तसेच विभागाची प्रतिमा चांगली ठेवायची असेल, कामे दर्जेदार व्हावीत असे वाटत असेल तर कंत्राटदार चांगले नेमा, अशा कडक शब्दात त्यांनी अधिका:यांना सूचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हेदेखील उपस्थित होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.
जिल्ह्यात 947 कोटींची कामे
बांधकाम विभागांतर्गत 405 किलोमीटची 947.52 कोटी खर्चाची कामे प्रस्तावित आहेत. 15 जुलैर्पयत या कामांचे काही टप्पे पूर्ण करावयाचे आहेत. यात मुसळी फाटा, धरणगाव-अमळनेर-बेटावद रस्ता, राज्य सीमा विटवा- भुसावळ, जामनेर-मोताळा-पिंपळगाव राजा-खामगाव रस्ता, चोपडा- खेडी भोकरी -अमोदा -कानळदा तसेच जळगाव, पाचोरा-वाडी, सातगाव, भराडी रस्ता, येवला नांदगाव, चाळीसगाव-भडगाव रस्ता, चांदवड- मनमाड- चाळीसगाव-नागद, अजिंठा रस्ता, मेहेरगाव, धुळे, अमळनेर व चोपडा रस्ता, सावखेडा फाटा ते धरणगाव, एरंडोल म्हसावद, नेरी, जामनेर रस्ता, यावल, बोरावल, टाकरखेडा, शेळगाव, कडगाव, भादली, आसोदा रस्ता आदी कामे प्रस्तावित आहेत.