जळगावात गुड फ्रायडेनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून प्रभू येशू यांच्या अंतिम प्रवासाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:21 PM2018-03-31T12:21:59+5:302018-03-31T12:21:59+5:30

विश्वशांतीसाठी प्रार्थना

Good Friday in Jalgaon | जळगावात गुड फ्रायडेनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून प्रभू येशू यांच्या अंतिम प्रवासाचे दर्शन

जळगावात गुड फ्रायडेनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतून प्रभू येशू यांच्या अंतिम प्रवासाचे दर्शन

Next
ठळक मुद्देप्रार्थना, उपासना सभेच्या सुरुवातीला गीत सादरप्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३१ - गुडफ्रायडेनिमित्त शहरातील चर्चमध्ये उपासना, प्रार्थना करण्यात आली. सोबतच शिरसोली रस्त्यावर मेहरुण तलावानजीक असलेल्या सेंट थॉमस चर्चच्यावतीने प्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा साकारण्यात येऊन प्रभूच्या अंतिम प्रवासाचे दर्शन घडविण्यात आले.
गुडफ्रायडेनिमित्त पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये ३० रोजी गुड फ्रायडे उपासना करण्यात येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. सोबतच प्रभू येशू यांचा संदेशदेखील देण्यात आला.
प्रार्थना, उपासना सभेच्या सुरुवातीला गीत सादर करण्यात आले. सोबतच बायबलचे वाचन करण्यात येऊन विश्वशांती, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रमुख वक्ते चर्चचे धर्मगुरु शशिकांत वळवी यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रभू येशू यांची शिकवण सांगितली. या वेळी चर्चचे सचिव आर.बी. इंगळे, कोषागार एस.बी. गावीत, प्रकाश शिंदे, प्रकाश आठवले, रत्नाकर मेश्रामकर, नितीन मकासरे, संजय पारधनी, एलिझाबेध वळवी, संगीता पवार, उषा आठवले, सर्व प्रमुख, सण्डे स्कूलचे मुले-मुली, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनय गायकवाड यांनी केले व आभार मानले.
मेहरुण तलावानजीक असलेल्या सेंट थॉमस चर्चच्या वतीने ३० रोजी संध्याकाळी चर्चपासून ते सेंट टेरेसा स्कूलपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये प्रभू येशू यांना क्रुसावर चढविताचा देखावा साकारण्यात आला. त्यानंतर चर्चमध्ये फादर डेव्हीस यांचे मार्गदर्शन झाले. या वेळी फादर जोशी, फाजर बिजू यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे परवानगी नाकारली
सेंट थॉमस चर्चच्या वतीने दरवर्षी चर्च ते मोहाडी रस्त्यापर्यंत रॅली काढण्यात येते. मात्र ३० रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चर्च ते सेंट टेरेसा स्कूलपर्यंतच या वर्षी रॅली काढण्यात आली.

Web Title: Good Friday in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.