‘गुड मॉर्निग लक्ष्मणराव’

By admin | Published: July 9, 2017 01:07 PM2017-07-09T13:07:30+5:302017-07-09T13:07:30+5:30

मी अनोळखी, बिनचेह:याचा असणंच फायदेशीर होतं

'Good Morning Laxmanrao' | ‘गुड मॉर्निग लक्ष्मणराव’

‘गुड मॉर्निग लक्ष्मणराव’

Next
>ऑनलाईन लोकमत
 
जळगाव, दि.9 - तुम्हाला ‘अंदर की बात’ सांगू? मला चेहरा मिळूच नये, अशी अनेकांची मनोमन इच्छा होती.  कारण मला चेहरा मिळाला तर त्यांचे मुखवटे उघडे पडले असते.  त्यापेक्षा मी अनोळखी, बिनचेह:याचा असणंच फायदेशीर होतं. कारण मग कोणालाही माझं नाव देणं सोयीचं होतं आणि माङया नावाखाली देशाला ओरबाडणंही सोयीचं होतं. किती हितचिंतक हो माङो? गणतीच नाही. या देशातल्या कोणत्याही पक्षाचा, जातीचा, वर्गाचा, गल्लीपासून ते दिल्लीर्पयतचा लहान मोठा प्रत्येक पुढारी हा माझाच हितचिंतक असतो.  प्रत्येक व्यापा:याला माझीच चिंता लागलेली असते.
 प्रत्येक सरकारी नोकर, अधिकारी हा तर माझीच सेवा करण्यासाठी असतो.  कोणत्याही सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना ही माङयासाठीच असते.. एवढं भाग्य कोणाच्या तरी नशिबात असेल का? एकच कोडं उलगडत नाही की, असं असूनही माङया परिस्थितीत काही फरक कसा पडत नाही? तुम्ही 1951 साली मला जो चेहरा दिलात, तो आजही तसाच आहे.. कायम गोंधळलेला.
माङया प्रत्येक हितचिंतकाचा असा दावा आहे की, मला त्याच्याइतकं दुसरं कोणीच ओळखत नाही. माझा खरा मित्र, जीवलग तोच. जणू काही मी म्हणजे तोच. पण मी तुम्हाला खरं सांगू? मला आजर्पयत माझा असा कोणीच सापडलेला नाही. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर सांगतो बघा - ‘आभाळ पाठीवर घेऊन फिरणा:या हत्तींना विचारा, तेही सांगतील - कुणीही कुणाचं नसतं’ अगदी तसंच मी सांगेन - ‘संसाराचं जड ओझं पाठीवर घेऊन फिरणा:या कॉमन मॅनला विचारा; तोही सांगेल - कुणीही कुणाचं नसतं!’ लक्ष्मणराव हे-हे सगळे पुढारी, व्यापारी अधिकारी सगळेच हे मला वापरून घेतात. याची फार खंत मी बाळगत नाही. काय करणार? अन्नछत्रात जेवणा:याने मिरपूड मागून चालत नाही! वाईट या गोष्टीचं वाटतं, की, हे सगळे मला मूर्ख समजतात- बिनडोक समजतात. या लोकांनी मला दाखवलेली सहानुभूती जितकी खोटी, तितक्याच मी यांना वाजवलेल्या टाळ्याही खोटय़ा आहेत, हे यांना कसं कळत नाही? आता खरे मूर्ख कोण? हे लोक मला काय ओळखतील! इथे मलाच माझी ओळख पटेना. यांना फायद्यापुरता माझा चेहरा उसना हवाय फक्त. बाकी माङया आयुष्याबद्दल यांना काय माहिती आहे?
यांच्यापैकी कुणी जुना साबण नव्या साबणाला चिकटवून वापरलाय? कपातला चहा पूर्ण संपवलाय? जुन्या टॉवेलची पायपुसणी केलीत? फाटके बनियन फर्निचर पुसायला वापरलेत? आइसक्रीमच्या रिकाम्या कपात खोबरेल तेलाची बाटली ठेवलीय? भांडय़ाला लागलेली साय चमच्याने खरवडून खाल्लीय? घरी आलेल्या मिठाईच्या खोक्याची रबर बॅँड्स जपून ठेवलीत? जुन्या साडय़ांची गोधडी करून घेतलीय? घरातले काजू एक-एक मोजून मुलांना वाटून दिलेत? चांगल्या तुपाचा रिकामा झालेला डबा पोळीने पुसून घेतलाय? जुन्या वह्या रद्दीत देण्याआधी त्यातली कोरी पानं फाडून घेतलीत? दाढी करून झाल्यानंतर ‘असू दे लागतात कशाकशाला..’ म्हणून जुनी ब्लेड्स जपून ठेवलीयेत?
- मला सांगा यातलं काय केलंय माङया या हितचिंतकांनी? नाही हो- यांना कॉमन मॅन कधी समजला नाही, आणि समजणारही नाही! प्रत्यक्ष आयुष्यात मी ज्याच्या जवळपासही फिरकृू शकत नाही, असा ‘हस्तीदंती’ नट पडद्यावर जेव्हा ‘माझी’ भूमिका करतो, तेव्हा एक कडवट हसू येतं ओठांवर! काय वाटतं यांना? फाटके कपडे, खडम्-खडम् वाजणारी रिकामी भांडी, वाढलेली दाढी म्हणजे ‘कॉमन मॅन’? किती हा मूर्खपणा! माङो कपडे नव्हे माझी विचारसरणी मला ‘कॉमन मॅन’ बनवते. इट्स नॉट अबाऊट द अटायर.. इट्स ऑल अबाऊट अॅटिटय़ूड! हे माङया या तथाकथित हितचिंतकांना कोण सांगणार? तुम्ही तर बाप्पाकडे निघून गेलात. ‘मी कोण?’ हे आता सांगावं तरी कुणी.. तुमच्या मागे? मला खरंच कधी कधी तुमची फार आठवण येते हो..- ऐकताय ना, लक्ष्मणराव?
- अॅड. सुशील अत्रे 
 

Web Title: 'Good Morning Laxmanrao'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.