खूशखबर... शिक्षकांसाठी आता विशेष रेल्वे गाडी; उन्हाळी सुट्ट्या करा एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 06:39 AM2023-04-24T06:39:50+5:302023-04-24T06:40:14+5:30
यासाठी रेल्वेने मुंबई-बनारस दरम्यान शिक्षक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ, (जि. जळगाव) : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून, विद्यार्थ्यांसह शिक्षकही पर्यटनस्थळ व आपल्या गावी जाण्यासाठी नियोजन करीत असतात. यासाठी रेल्वेने मुंबई-बनारस दरम्यान शिक्षक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. ०११०१ ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ मे रोजी दुपारी १२:१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी सायं. ४ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०११०२ ही ३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता पोहोचेल. दि. ६ जून मुंबई-बनारस व ७ जूनला बनारस मुंबई ही गाडी वरील वेळेनुसार असेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी हे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एक प्रथमसह एक द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी असे डबे असतील.