पंकज बालसंस्कार केंद्रात गोपाळकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:33+5:302021-09-02T04:34:33+5:30
गोपाळकाला म्हणजे काय? त्यात कोणत्या पदार्थांचे कालवण करतात? गोपाळ व काला या शब्दांचा अर्थ विषद केला, याबद्दल जयश्री हिंगे ...
गोपाळकाला म्हणजे काय? त्यात कोणत्या पदार्थांचे कालवण करतात? गोपाळ व काला या शब्दांचा अर्थ विषद केला, याबद्दल जयश्री हिंगे यांनी माहिती दिली. दहीहंडी सजावट करून सुरुवातीला मीना माळी व उपस्थित पालकांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केले. अनेक विद्यार्थी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा करून आलेले होते. या सर्वांनी दांडिया नृत्य, फुगडी सादरीकरण केले. त्यानंतर सर्व बालगोपाळ विद्यार्थी, शिक्षिकांनी जन्मोत्सव निमित्ताने नृत्य केले. ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की’ या घोषणा दिल्या. त्यानंतर ‘आरती कुंज बिहारी की’ गायन व आरती केली.
उपस्थित बाळकृष्ण मोक्ष जैस्वाल याने श्रीफळाच्या सहाय्याने दहीहंडी फोडली. यामध्ये रिशान पंकज बोरोले, मोक्ष दिलीप जैस्वाल,
तनुजा नीलेश कोळी, रुंदन उमेश ठाकरे, नेत्रा गणेश चव्हाण, रोनीत संदीप पाटील, स्नेहल प्रमोद सूर्यवंशी या बालकांचा सहभाग होता. सर्व उपस्थितांना गोपाळकाला प्रसाद वितरण करण्यात आला. लाह्यांचा प्रसाद वितरित केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया बारी, भावना दीक्षित, संध्या पाटील, अनिता बऱ्हाटे, योगिता कोळी, सुनंदा विसावे, नंदा पाटील, विजय सोनवणे यांनी प्रयत्न केले.
310821\31jal_8_31082021_12.jpg
पंकज बालसंस्कार केंद्रात गोपाळकाला