आला उन्हाळा, आरोग्य संभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:36 PM2018-04-09T17:36:27+5:302018-04-09T17:36:27+5:30
तज्ज्ञांचा सल्ला आजार बळावण्याची शक्यता, लहान मुलांची घ्या काळजी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.९ : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ््याचे आगमन झाले असून उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. या वाढत्या उन्हासोबत विविध आजारही वाढतात, त्यामुळे ‘आरोग्य सांभाळा...’ असाच सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शरीरातील पाणी कमीमुळे थकवा
उन्हामुळे शरीराचे तापमान वाढण्यासह शरीरातील पाणीदेखील कमी होते. त्यामुळे थोडे जरी कष्टाचे काम केले तर थकवा येतो. इतकेच नव्हे चक्कर येऊन प्रकृतीही खालावते. यासाठी शरीराचे पाणी कायम ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे व शक्यतो अवजड कामे करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विविध आजार काढतात डोके वर
उन्हाळ््यामध्ये जुलाब, उलट्या, कावीळ, विषमज्वर (टायफाईड), डायरिया असे आजार होण्यासह सर्वात मोठा धोका उष्माघाताचा असतो. या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वत:च दक्षता घेणे महत्त्वाचे असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उन्हाळ््यामध्ये लग्न समारंभदेखील जास्त असतात. अशा ठिकाणी शक्यतो लहान मुलांना घेऊन जावू नये तसेच कोणत्याही समारंभात पाण्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.
मुलांची घ्या काळजी
उन्हाळ््यामध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढून डोळ््यांची साथ पसरते. या सोबतच गोवर, गालफुगी, कांजण्या असे आजार लहान मुलांना होत असतात. हे सर्व आजार संसर्गजन्य असल्याने अशा मुलांना शाळेत पाठवू नये, पाच चे सहा दिवस त्यांची घरीच विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देत मुलांना फळांचा जास्तीत जास्त रस द्यावा, असे आवाहनही डॉक्टरांच्यावतीने करण्यात आले आहे.
हे टाळा
- उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावे
- बर्फाचा गोळा ज्या पासून तयार होतो, त्या बर्फाच्या दर्जाची शाश्वती नसते, त्यामुळे बर्फाचे गोळे खावू नये.
- सकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये
- जीन्स, घट्ट कपडे यांचा वापर टाळावा, आजारी मुलांना शाळेत पाठवू नये
- आहारामध्ये उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.
अशी घ्या काळजीशी घ्या काळजी
- भरपूर पाणी प्या
- फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खा
- घर, कार्यालय व कामाच्या ठिकाणी कोठेही थंड वातावरण राहण्यासाठी कुलरचा वापर करा
- बाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमाल अवश्य बांधा
- शक्यतो बाहेरची कामे सकाळीच करून घ्यावी
- सुती व मोकळी कपड्यांचावापरकरा
जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा दरवर्षी ४६ ते ४७ अंशावर पोहचतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीनेदेखील दक्षता घेतली जाते. दरवर्षी यासाठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार यंदा तर फेब्रुवारी महिन्यातच या कक्षाची तयारी झाली असून यासाठी तीन खाटा (बेड) कुलर, एसीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन खाटा, एसी, कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय.