धान्याचे गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:02 AM2019-09-15T00:02:53+5:302019-09-15T00:03:23+5:30
विश्लेषण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : रावेर व यावल तालुक्यातील धान्य घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासणी झाली, अहवाल आला तरीदेखील मात्र एका गोदामातील धान्याबाबत कोणीच जबाबदारी घेत नसल्याने या धान्याचे काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
यावल- रावेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानावरील धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अचानकपणे छापा टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे, विलास चौधरी व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून तपासणी करण्यात आली. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेर तालुक्यातील १० असे एकूण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते.
या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये रावेर येथील बºहाणपूर रस्त्यांवरील (गोदाम क्रमांक २) व जीआयसी कॉलनीमधील (गोदाम क्रमांक ३) मधील साठ्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे संबंधितांनी सादर केले. या मध्ये गोदाम क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसऱ्या गोदाममध्ये मका साठवलेला होता. मात्र गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आलेल्या पहिल्या गोदाममध्ये असलेल्या साठ्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे या तीनही गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावल तालुक्यातील ८ तर रावेर तालुक्यातील ६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले व त्यानुसार या १४ दुकानांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. तसेच त्यापूर्वीच दोन दुकानांचे परवाने रद्द झाल्याने ही संख्या आता १६वर पोहचली.
कारवाई होताना दिसत असली तरी एका गोदामातील धान्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने या गौडबंगालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.