यावल तालुक्यातील डोंगरदे येथे गोवर्धन पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 18:52 IST2020-11-15T18:52:10+5:302020-11-15T18:52:34+5:30
जागृत दत्त देवस्थान येथे रविवारी गोवर्धन पूजा करण्यात आली.

यावल तालुक्यातील डोंगरदे येथे गोवर्धन पूजा
फैजपूर, ता.यावल : जागृत दत्त देवस्थान, डोंगरदे, ता.यावल येथे रविवारी गोवर्धन पूजा प.पू. महामंडलेशवर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी प.पू.स्वामी स्वरूपानंद महाराज, ह.भ.प. गुरव महाराज व भक्तगण उपस्थित होते. याप्रसंगी पर्वतराजाची आरती करून ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले.
भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्र देवतेपासून गोकुळाच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वतास शरण जाऊन गोवर्धन पर्वताने गोकुळाच्या केलेल्या रक्षणामुळे आपल्या धर्मात पर्वतांनासुद्धा देवताच मानलेले आहे. आपणही गोकुळाप्रमाणे या आपल्या गोवर्धन रुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन या पर्वतावर वृक्ष संवर्धन, जलसंधारण आदी कामे करून शरण जावे व हाच सातपुडा गोवर्धनाप्रमाणेच आपले रक्षण करण्यास समर्थ असल्याचे आशीर्वचन प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गोवर्धन पूजेप्रसंगी केले.
यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.