भडगावचे शासकीय धान्य खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:46+5:302021-07-04T04:12:46+5:30

ज्वारी उद्दिष्टाप्रमाणे जवळपास खरेदी झाली आहे. मात्र गहू व मका उद्दिष्टापैकी थोड्याच शेतकऱ्यांनी गहू व मका मोजला आहे तर ...

Government grain procurement center in Bhadgaon closed | भडगावचे शासकीय धान्य खरेदी केंद्र बंद

भडगावचे शासकीय धान्य खरेदी केंद्र बंद

googlenewsNext

ज्वारी उद्दिष्टाप्रमाणे जवळपास खरेदी झाली आहे. मात्र गहू व मका उद्दिष्टापैकी थोड्याच शेतकऱ्यांनी गहू व मका मोजला आहे तर गहू व मका उत्पादक काही शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे. शासनाने धान्य खरेदीचे तालुक्यासाठी उद्दिष्ट वाढवावे. धान्य मोजणीसाठी मुदत वाढवावी. ऑनलाइन केलेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे धान्य मोजण्यात यावे, अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी १ ते ३० एप्रिलदरम्यान झाली होती. भडगाव येथे शासकीय धान्य खरेदीस दि. २२ जून रोजी सुरुवात झाली होती. शासनाच्या आदेशानुसार दि. ३० जून रोजी धान्य खरेदी बंद झाली आहे. शेतकरी सहकारी संघास शासनाचे याबाबतचे परिपत्रकही प्राप्त झाले आहे, अशी माहिती शेतकरी सहकारी संघाचे सचिव अवधूत देशमुख यांनी दिली.

शासनाने धान्याचे भाव जाहीर केले होते ते पुढीलप्रमाणे

गहू १९७५ रुपये

ज्वारी २६२० रुपये

मका १८५०

ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी

गहू १२

मका ५६०

ज्वारी १०६३

भडगाव शेतकरी सहकारी संघाचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पत्र

रब्बी पणन हंगाम सन २०२०-२१ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, या मागणीचे लेखी पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे, आमदार किशोर पाटील, भडगाव तहसीलदार सागर ढवळे, व्यवस्थापक राज्य शासन खरेदी भरड धान्य केंद्र मुंबई आदींना लेखी पत्र पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती भडगाव शेतकरी सहकारी संघाचे सचिव अवधूत देशमुख यांनी दिली.

Web Title: Government grain procurement center in Bhadgaon closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.